Cow Farming Tips : भारतात पशुपालन (Animal Husbandry) मोठ्या प्रमाणात केले जाते. पशुपालनात गाईंचे पालन (Cow Rearing) आपल्या देशात सर्वाधिक केले जाते. हिंदू धर्मात गाईला धार्मिक महत्त्व देखील प्राप्त असल्याने गाईंचे पालन भारतात सर्वाधिक होत आहे.
मित्रांनो जाणकार लोक गाय पालनातून चांगली कमाई (Farmer Income) करण्यासाठी गाईच्या सुधारित जातींचे (Cow Breed) पालन करण्याचा सल्ला देतात. अशा परिस्थितीत आज आपण गायीच्या एका देशी आणि चांगल्या दुग्ध उत्पादन क्षमता असलेल्या जातीची माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो आज आपण गाईच्या गीर जातीची (Gir Cow) माहिती जाणून घेणार आहोत. गीर गाय ही भारतीय वंशाची मुख्य दुधाळ देशी जात आहे.
गीर गायीला देसन, गुजराती, काठियावाडी, सुरती, सोर्थी इत्यादी नावांनीही ओळखले जाते. या जातीचे मूळ गुजरातमधील दक्षिण काठियावाडमधील गीर जंगलात असल्याचे मानले जाते. म्हणूनच या जातीला गीर नाव पडलं आहे. गीर गाय ही एक देशी जात असून ही जात जास्त दूध उत्पादनासाठी ओळखली जाते.
गीर गायीची ओळख
गीर जातीच्या गायीच्या शरीराचा रंग लाल असतो.
त्यांच्या शरीरावर गडद लाल किंवा चॉकलेटसारखे तपकिरी डाग आढळतात.
गीर गायींचे शरीर मध्यम ते मोठे असते.
मादी गीर गाईचे वजन सुमारे 385 किलो आणि उंची 130 सेमी असते.
दुसरीकडे, नर गीरचे सरासरी वजन 545 किलो आणि उंची सुमारे 135 सेमी आहे.
गीर गायीचे कपाळ बहिर्वक्र आणि रुंद असते, जे त्यांना कडक सूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्यास मदत करते.
गीर जातीच्या गायीचे कान लांब आणि खाली लटकलेले असतात.
गीर गायीची वैशिष्ट्ये
गीर गाय 1200 ते 1800 लिटर दूध देते.
ही गाय दररोज 12 लिटरपेक्षा जास्त दूध देते.
या जातीच्या दुधात 4.5 टक्के फॅट असते.
वयाच्या 3 ऱ्या वर्षी ही जात पहिल्या वासराला जन्म देण्यास सक्षम होते.
एक गाय आपल्या आयुष्यात 6 ते 12 वासरांना जन्म देते.
गीर गायीचे सरासरी वय 12 ते 15 वर्षे असते.
गीर गाईची प्रतिकारशक्ती चांगली असते.
ही गाय वेगवेगळ्या हवामानात आणि उष्ण प्रदेशातही सहज राहू शकते.
गीर गाईची किंमत (gir cow price)cow far
भारतीय बाजारपेठेत गीर गायीची किंमत 20 हजार ते 25 हजार रुपयांपर्यंत आहे. गीर गाईची किंमत गाईची दूध देण्याची क्षमता, वय आणि आरोग्य यावर अवलंबून असते.