Cow Farming Tips : भारतात शेती व्यवसायाच्या सुरुवातीपासूनच शेतीसोबतच पशुपालन व्यवसाय केला जात आहे. पशुपालन व्यवसायात शेतकरी बांधव सर्वाधिक गायींचे संगोपन करत असतात. गाय पालन शेतकरी बांधवांसाठी विशेष फायद्याचे देखील ठरत आहे.
गाय पालनातून (Cow Rearing) शेतकऱ्यांना चांगली कमाई होते मात्र असे असले तरी जाणकार लोक शेतकरी बांधवांना गायींच्या संकरित जातींचे संगोपन करण्याचा सल्ला देतात. विशेष म्हणजे आपल्या देशातील वैज्ञानिक देखील पशुपालक शेतकरी बांधवांना फायदा मिळावा या अनुषंगाने गाईच्या वेगवेगळ्या संकरित जातींची निर्मिती देखील करत असतात.
लाला लजपत राय पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी देखील गाईची एका संकरित जातीची निर्मिती केली आहे. या विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी तीन जातीच्या क्रॉस ब्रीड च्या माध्यमातून हरधेनू गाईची निर्मिती केली आहे.
हरधेनु गाय तीन जातींच्या मिश्रणातून बनवली आहे
गाईची हरधेनू जात उत्तर-अमेरिकन (होलस्टीन फ्रिझेन), देशी हरियाणा आणि साहिवाल जातीच्या क्रॉस ब्रीडपासून बनलेली आहे. यामध्ये 62.5 टक्के रक्त उत्तर-अमेरिकेचे असून 37. 5 टक्के रक्त हरियाणा आणि साहिवालचे आहे.
हरधेनू गायीची दूध देण्याची क्षमता
जाणकार लोकांच्या मते, इतर जातींच्या तुलनेत ही जात खूप चांगली आहे. गायीच्या इतर दिवशी जाती दररोज सरासरी 5-6 लिटर दूध देतात. मात्र भारतीय संशोधकांनी तीन जातींच्या क्रॉस ब्रीड मधून तयार केलेल्या हरधेनू गायीपासून सरासरी 50-55 लिटर दूध पशुपालक शेतकऱ्यांना मिळत आहे.
हरधेनु गायीचा खुराक
जर आपण या गायीच्या आहाराबद्दल बोललो तर ती एका दिवसात सुमारे 40-50 किलो हिरवा चारा खाते. त्याच वेळी, 4-5 किलो कोरडा चारा खात असते.
हरधेनु गायीची वैशिष्ट्ये
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, हरधेनू गाय 20 महिन्यांत प्रजननासाठी विकसित होते. मात्र इतर देशी जाती 36 महिन्यात प्रजननासाठी तयार होत असतात.
हरधेनू जातीची गाय 30 महिन्यांच्या वयापासून वासरे देण्यास सुरुवात करतात, तर स्थानिक जाती 45 महिन्यांपासून वासरे देतात. मित्रांनो जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन गाईंच्या जातीपासून संकरित करण्यात आलेली हरधेनू जातीच्या गाईची दूध देण्याची क्षमता जास्त असून त्यात फॅटचे प्रमाणही जास्त आहे.सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही गाय कोणत्याही तापमानात जगू शकते. यामुळे निश्चितच भारतातील पशुपालक शेतकरी बांधवांसाठी या गायीचे संगोपन फायद्याचे ठरणार आहे.