Cow Farming : गाय पालन हा व्यवसाय आपल्या देशात फार पूर्वीपासून केला जात आहे. शेतीसोबतच जोड व्यवसाय म्हणून गाय पालन केले जात आहे. या व्यवसायातून शेतकऱ्यांना निश्चितच चांगले उत्पन्न मिळत आहे.
शेतीसोबतच जोड व्यवसाय म्हणून गाय पालन केले जात असल्याने शेतकऱ्यांना यातून चांगले उत्पन्न मिळते. अतिरिक्त उत्पन्नासाठी हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे.
तथापि या व्यवसायातून जर अधिकची कमाई करायची असेल तर गायीच्या सुधारित जातींच्या संगोपन करणे आवश्यक असते.
अशा परिस्थितीत आज आपण इंग्रजांनी भारतात आणलेल्या गायीच्या एका जातीची माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण साहिवाल या गायीच्या जाती विषयी जाणून घेणार आहोत.
साहिवाल गायीच्या विशेषता
या जातीच्या गायीचा रंग हा प्रामुख्याने लाल असतो. गायीचे शिंगे आखूड असतात आणि कानाजवळ वळलेली असतात.
गायीची ही जात अधिक दूध उत्पादनासाठी ओळखली जाते. या जातीच्या गायीचे वजन 300 ते 350 किलो एवढे असते. तसेच या जातीच्या एका वळूचे वजन 500 किलो पर्यंत भरते.
ही गाय एका वेतात 1700 लिटर ते 2750 लिटरपर्यंत दूध देण्यात सक्षम असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे. या गायीच्या दुधात 4.9% एवढे फॅट आढळते.
यामुळे या जातीच्या गायीच्या दुधाला बाजारात मोठी मागणी असते आणि चांगला भाव मिळतो. या गायीच्या दुधात चांगले फॅट आढळत असल्याने शेतकऱ्यांसाठी या जातीच्या गायीचे संगोपन फायदेशीर ठरत आहे.
यामुळे दूध उत्पादनासाठी या जातीच्या गायीचे मोठ्या प्रमाणात संगोपन केले जाते. या जातीची गाय एन.डी. आर. आय. करनाल (हरीयाणा राज्य), नवी दिल्ली येथील कृषि महाविद्यालय उपलब्ध होते.
याशिवाय पशुपालक शेतकरी बांधव या जातीची गाय कानपूर, तसेच पंजाब मधील खाजगी गोठ्यातून प्राप्त करू शकणार आहेत.