Cow Farming : भारतात फार पूर्वीपासून शेती सोबतच शेती पूरक व्यवसाय देखील केले जात आहेत. शेतीपूरक व्यवसायात पशुपालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. गाय, म्हैस, शेळी, मेंढी, वराह अशा इत्यादी प्राण्यांचे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात संगोपन केले जाते. यातील गाय पालन हा व्यवसाय प्रामुख्याने दुधाच्या उत्पादनासाठी केला जातो.
अलीकडे मात्र गायीच्या दुधाचा धंदा हा शेतकऱ्यांसाठी परवडत नाहीये. एकतर हवामान बदलामुळे गाय पालनातून अपेक्षित असे दूध उत्पादन मिळत नाहीये. दुसरे म्हणजे पशुखाद्यांच्या किमती वाढत आहेत, मजुरीचे दरही वाढत आहेत.
शिवाय इंधनाच्या किमती वाढल्या असल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. तसेच गायीच्या दुधाला बाजारात पाहिजे तसा भाव मिळत नाहीये. यामुळे काय पालनातून शेतकऱ्यांना अलीकडे चांगली कमाई होत नसल्याचे वास्तव आहे.
यामुळे शेतकरी बांधव गाय किंवा म्हैसने अधिक दूध दिले पाहिजे यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करत असतात. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार गाय किंवा जेवढे अधिक पाणी पिते तेवढे अधिक दूध ती देत असते.
दरम्यान आज आपण गायीने किती पाणी पिले म्हणजे ती किती दूध देते ? याबाबत तज्ञ लोकांनी दिलेली माहिती थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पशुवैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार गाय जेव्हा वीस लिटर पाणी देते तेव्हा एक लिटर दूध तयार होत असते. अर्थातच 100 लिटर पाणी पिल्यानंतर गाय वीस लिटर पर्यंतचे दूध देऊ शकते.
गायीने जर बारा किलो चारा खाल्ला असेल तर तो पचवण्यासाठी तिला 50 लिटर पाण्याची गरज असते. यामुळे गाईने एका दिवसात किमान दीडशे लिटर पाणी पिले तर ती वीस लिटर पर्यंतचे दूध देऊ शकते.
आता जर गाय कमी पाणी पित असेल तर काय केले पाहिजे ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की गाय किंवा म्हैस जर कमी पाणी पित असेल तर पाण्यात तुरटी फिरवली पाहिजे.
तुरटी फिरवल्यानंतर पाणी स्वच्छ होत असते. तसेच स्वच्छ पाणी गाय किंवा म्हैस अधिक प्रमाणात पितात. यामुळे जर गाय किंवा म्हैस कमी पाणी पित असेल तर पाण्यात तुरटी फिरवून असे पाणी जनावरांना पिण्यासाठी दिले पाहिजे.
असे केल्यास काय जास्तीचे पाणी पिणार आणि दूधही जास्त मिळणार. मात्र अशा प्रकारचा कोणताही उपाय करण्यापूर्वी एकदा पशुवैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ लोकांचा सल्ला घेणे जरुरीचे राहणार आहे.