Cow Farming: भारत हा शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. आपल्या देशात शेतीनंतर पशुपालन (Animal Husbandry) हा एक मुख्य व्यवसाय आहे. खरं पाहता पशूपालन हा शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा (Farmer Income) दुसरा सर्वात मोठा स्त्रोत आहे.
पशुपालनाचा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा देखील म्हटले जाते. अधिक शेतकरी पशुपालनाच्या व्यवसायाशी निगडित आहेत, सरकारही यासाठी शेतकऱ्यांना (Farmer) सातत्याने प्रोत्साहन देत आहे. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, शेतकरी बांधवांना जर शेतीतून (Farming) आर्थिक प्रगती करायची असेल तर शेतकरी बांधवांनी शेती समवेतच पशुपालन अवश्य केले पाहिजे.
विशेष म्हणजे मायबाप शासन देखील आता पशुपालन व्यवसाय करणाऱ्याला प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या योजना कार्यान्वित करीत आहे. अनेक राज्य सरकारे आपल्या राज्यातील पशुपालक शेतकऱ्यांना पशुपालन करण्यासाठी आर्थिक साहाय्य देखील उपलब्ध करून देत आहेत. पशुपालनात आपल्या देशात सर्वाधिक गाईंचे पालन (Cow Rearing) केले जाते विशेष म्हणजे गायपालन तुलनेने शेतकऱ्यांसाठी विशेष फायद्याचे देखील ठरत आहे.
जाणकार लोकांच्या मते, जर शेतकरी बांधवांनी गाईच्या सुधारित जातीचे (cow breed) पालन केले तर त्यांना गाय पालन व्यवसायातून लाखों रुपये उत्पन्न मिळू शकते. हरधेनू ही देखील अशीच एक गाईची सुधारित जात आहे. विशेष म्हणजे ही जात अधिक दूध देण्यासाठी ओळखली जाते. चला तर मग मित्रांनो घेऊया हरधेनू जातीच्या गाईविषयी सविस्तर.
हरधेनू गाईची विशेषता
मित्रांनो जर आपणास हरधेनू गाईचे पालन करायचे असेल तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, हरधेनू गाय दररोज 50-55 लिटर दूध आरामात देते. यामुळे दुग्धोत्पादनासाठी गाय पालन करणाऱ्या पशुपालक शेतकऱ्यांसाठी या गाईच्या जातीचे पालन फायदेशीर ठरणार आहे.
ही गाय हरियाणाच्या लाला लजपत राय युनिव्हर्सिटी ऑफ व्हेटरनरी अँड अॅनिमल सायन्स (लुवास) च्या शास्त्रज्ञांनी तीन जातींचे मिश्रण करून तयार केली आहे. तज्ज्ञांच्या मते, ही हरधेनू जात उत्तर-अमेरिकन (होलस्टीन फ्रीझन), स्थानिक हरियाणवी आणि साहिवाल जातीच्या संकरित जातींपासून खास तयार करण्यात आली आहे. एकंदरीत ही गाय त्रिवेणी संगमचं म्हणावी लागेल.
हरधेनू गाय पालन ठरणार फायदेशीर
जाणकार लोकांच्या मते हरधेनू गाईच्या जातीची दूध क्षमता इतर जातीच्या गायींच्या तुलनेत खूप जास्त आहे. याच्या दुधाचा रंग इतर गायींच्या दुधापेक्षा जास्त पांढरा असतो. इतर गायींमध्ये दिवसाला सरासरी 5-6 लिटर दूध देण्याची क्षमता असते, परंतु हरधेनू गायीच्या बाबतीत असे नाही.
हरधेनू गाय एका दिवसात सरासरी 15 ते 16 लिटर दूध देते. दुसरीकडे, जर तुम्ही तिचा आहार चांगला ठेवला तर ही गाय एका दिवसात 55-60 लिटर दूध देऊ शकते. निश्चितच हरधेनू गाईच्या जातीचे पालन दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अधिक फायद्याचे ठरणार आहे.