Cow Farming : भारतात फार पूर्वीपासून गाय पालनाचा व्यवसाय केला जातोय. शेतीला जोड धंदा म्हणून अनेकजण हा व्यवसाय करत आहेत. हा व्यवसाय दुग्ध उत्पादनासाठी केला जातो. यामुळे अधिक दूध देणाऱ्या गाईच्या जातीचे संगोपन केले जाते. गाय पालनातून जर चांगली कमाई करायची असेल तर गाईच्या चांगल्या सुधारित जातींचे संगोपन करणे आवश्यक आहे.
दरम्यान, आज आपण देशी गाईच्या अशाच एका जातीची माहिती पाहणार आहोत. आज आपण ज्या गाईची माहिती पाहणार आहोत ती गाय वर्षातील 275 दिवस दूध देते. यामुळे पशुपालकांना या जातीच्या पालनातून चांगली कमाई होणार आहे.
कोणती आहे ती गाय?
आम्ही ज्या गायीबद्दल बोलत आहोत ती आहे लाल कंधारी. ही देशी गायीची जात आहे. या गायीचे संगोपन भारतात फार मोठ्या प्रमाणावर केले जाते. विविध राज्यांमध्ये या जातीची गाय आढळते. ही गाय दुग्धोत्पादनासाठी विशेष ओळखली जात आहे.
तज्ञ लोकांनी या जातीच्या गायी पाळण्याचा सल्ला दिलाय. लाल कंधारी गाय ही भारतातील गायीची एक प्रमुख दुभती जात मानली जाते. भारतातील कर्नाटक आणि महाराष्ट्रात ही गाय मोठ्या प्रमाणात नजरेस पडते.
राज्यातील बहुतांशी भागांमध्ये या जातीचे संगोपन केले जाते. लाल कंधारी जातीची गाय ही शेतकऱ्यांसाठी हिऱ्याच्या खाणीपेक्षा कमी नाही, कारण ही गाय सर्वाधिक दूध देणारी देशी गाय आहे. ही गाय वर्षातून २७५ दिवस दूध देते.
महाराष्ट्रातील हवामान या जातीसाठी खूपच अनुकूल आहे. यामुळे या जातीचे संगोपन करून पशुपालकांना चांगली कमाई होणार आहे. लाल कंधारी गायीची लांबी सुमारे 128 सें.मी. असते.
ही गाय मध्यम आकाराची आहे, या जातीचे कपाळ रुंद, लांब कान आणि शिंगे वाकलेली असतात. या लाल कंधारी जातींचे वळू हे १३८ सें.मी. लांब असतात.
ही गाय एका वेतात जवळपास 600 लिटर दूध देते. इतर हायब्रीड जातीच्या तुलनेत हे दुधाचे प्रमाण कमी आहे. पण ही गाय खूपच कमी चारा खाते अन अधिकचे दूध देते. या गायीचे एक वैशिष्ट्य म्हणजे ती कोणत्याही वातावरणात सहज राहू शकते.
जर आपण त्याच्या किंमतीबद्दल बोललो तर या गायीची किंमत 30 हजार रुपयांपर्यंत आहे. या गाईच्या दुधात अनेक औषधी गुणधर्म आढळतात. यामुळे बाजारात या जातीच्या गायीच्या दुधाला मागणी आहे.
या जातीच्या गायीच्या दुग्धजन्य पदार्थांना देखील बाजारात खूपच मागणी असते. शिवाय इतर दुधापेक्षा या जातीच्या गायीच्या दुधाला बाजारात अधिकचा भाव मिळतो. यामुळे या जातीचे संगोपन शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.