Cow Farming : भारतात शेतीचा व्यवसाय हा फार पूर्वीपासून केला जातो. शेतीसोबतच आपल्या देशात पशुपालनाचा व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात केला जात आहे. पशुपालन करणारे शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात गाईचे संगोपन करतात. गाय पालनाचा व्यवसाय हा प्रामुख्याने दूध उत्पादनासाठी केला जातो.
यामुळे गायीच्या अशा जातींचे संगोपन केले जाते ज्यांची दूध देण्याची क्षमता ही अधिक असते. दरम्यान जर तुम्हीही दुधाचा व्यवसाय करत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास करणार आहे.
कारण की, आज आपण गाईच्या अशा एका जातीची माहिती जाणून घेणार आहोत जी की दूध उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. आज आपण गाईच्या गंगातीरी या जाती विषयी माहिती पाहणार आहोत. गाईची ही जात पशुपालक शेतकऱ्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहे.
तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, गायीची ही जात दिवसाला 16 लिटरपर्यंतचे दूध देण्याची क्षमता ठेवते. दरम्यान आता आपण गंगातीरी गाईच्या इतर काही विशेषतः अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
गंगातीरी गाईच्या विशेषता
गाईची ही एक देशी जात असून या जातीचे संगोपन उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यात मोठ्या प्रमाणात केले जाते. आपल्याकडे मात्र या जातीचे फारसे संगोपन केले जात नसल्याचे पाहायला मिळते.
गाईची ही देशी जात उच्च दूध उत्पादनासाठी ओळखली जाते. या गाईच्या दुधात विविध औषधी गुणधर्म आढळतात. त्यामुळे बाजारात या गायीच्या दुधाला खूप मोठी मागणी पाहायला मिळते.
शिवाय भाव देखील अधिक मिळतो. यामुळे दूध उत्पादक शेतकरी बांधव या जातीच्या गायीचे अलीकडे मोठ्या प्रमाणात संगोपन करू लागले आहेत. या जातीच्या गाई पांढऱ्या आणि तपकिरी रंगाच्या असतात.
या गाईचे वजन सरासरी अडीचशे किलो पर्यंतचे असते. या गाईच्या किमती बाबत बोलायचं झालं तर या जातीची गाय बाजारात 40 ते 60 हजार रुपयांपर्यंत उपलब्ध होते. निश्चितच, या जातीच्या संगोपन करून शेतकऱ्यांना चांगली कमाई करता येणार आहे.