Cow Farming : भारतात गेल्या कित्येक दशकांपासून पशुपालन व्यवसाय (Animal Husbandry) केला जात आहे. शेतकरी बांधव शेतीला जोड व्यवसाय (Agriculture Business) म्हणून पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात करत असतात. पशुपालनात गाई पालनाला (Cow Rearing) एक वेगळे महत्त्व देण्यात आले आहे. हिंदू सनातन धर्मात गाईला पवित्र मानले गेले असल्याने गाई पालनाला अधिक महत्व प्राप्त होत आहे.
तसेच अल्पभूधारक शेतकरी बांधवांसाठी गाय पालन हा एक अतिशय फायदेशीर व्यवसाय सिद्ध होत आहे. मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे गायपालन हे मुख्यतः दुग्ध उत्पादनासाठी केले जाते. अशा परिस्थितीत गाईच्या सुधारित जातींचे संगोपन करणे अतिशय महत्त्वाचे राहते. जाणकार लोक देखील दुग्ध उत्पादनासाठी सरस असलेल्या तसेच आपल्या हवामानात तग धरणाऱ्या गायींच्या जातींचे संगोपन करण्याचा सल्ला देत असतात.
अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी एका देशी आणि दुग्धोत्पादनासाठी उत्तम असलेल्या गाईच्या जातीची माहिती घेऊन हजर झालो आहोत. मित्रांनो आज आपण गिर गाई (Gir Cow) विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जाणकार लोकांच्या मते, गीर गायीचे संगोपन (Gir Cow Rearing) पशुपालक शेतकरी बांधवांना अधिक उत्पन्न (farmer income) मिळवून देऊ शकते. या गाई ची सर्वात मोठी विशेषता म्हणजे ही गाय इतर गाईंच्या तुलनेत अधिक दूध देते.
यामुळे शेतकऱ्यांच्या घरी निश्चितच दुधाची गंगा वाहणार आहे. गाई पाळण्यासाठी शेतकरी गीर गायीची प्रजाती निवडू शकतात. ही गाय एका दिवसात 12 लिटरपेक्षा जास्त दूध देते. गायीच्या या जातीमध्ये स्वर्ण कपिला आणि देवमणी या उपजाती सर्वोत्तम मानल्या जातात.
गीर गायीची ओळख
गीर गाय गडद लाल-तपकिरी आणि चमकदार पांढरी रंगाची असते. त्याचे कान लांब असतात. कपाळावर एक फुगवटा आहे. त्याच वेळी, शिंगे मागे वाकलेली असतात. त्याचा आकार मध्यम ते मोठ्या पर्यंत बदलतो. चांगली प्रतिकारशक्ती असल्याने या गायी कमी आजारी पडतात.
गीर गायींच्या संगोपनातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो
भारतात गीर गाय ही दूध उत्पादनासाठी सर्वोत्तम मानली जाते. गीर गायीचे आयुष्य 12 ते 15 वर्षे असते. ते आपल्या आयुष्यात 6 ते 12 वासरांना जन्म देते. या गायीने दररोज 12 लिटर दूध दिले तर ती 30 दिवसांत 360 लिटर दूध देते आणि वर्षभरात सुमारे 4000 लिटर दूध देते. निश्चितच या गाईचे संगोपन केल्यास शेतकरी बांधवांच्या घरी बाराही महिने दूधगंगा वाहणार आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधव गीर गाईचे संगोपन करून लाखो रुपयांचा नफा कमवू शकतात.