Cotton Rate : गेल्या वर्षी कापसाला चांगला भाव मिळाला नव्हता. मात्र तरीही यावर्षी चांगला बाजारभाव मिळेल अशी भोळी-भाबडी आशा उराशी बाळगून शेतकऱ्यांनी यंदा पुन्हा मोठ्या क्षेत्रावर कापूस लागवड केली.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चांगला भाव मिळेल अशी आशा बाळगून राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश मधील बहुतांशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस लागवड केली.
मात्र शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा पुन्हा चुराडा झाला आहे. एकतर खरीप हंगामातील दुष्काळामुळे, अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीच्या तडाख्यामुळे कापसाचे पीक पूर्णपणे उध्वस्त झाले. यातून काही शेतकऱ्यांनी पिके वाचवली.
मात्र उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. शिवाय सध्यास्थितीला कापसाला बाजारात हमीभावापेक्षा कमी दर मिळतोय. सध्या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये कापसाला पाच हजार पाचशे ते सहा हजार सहाशे असा भाव मिळतोय.
या भावात कापसाची विक्री केली तर पिकासाठी आलेला खर्च देखील वसूल करता येणार नाही असे मत आता शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. गेल्या आठवड्यात मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश मधील बहुतांशी बाजार समित्यांमध्ये कापसाला साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटल ते सात हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा भाव मिळत होता.
या चालू आठवड्यात मात्र बाजारभावात 400 रुपयांपर्यंतची घसरण पाहायला मिळाली आहे. वास्तविक दरवर्षी दिवाळीनंतर कापसाचे भाव वाढतात. दरवर्षीचा हा ट्रेंड पाहता अनेक शेतकऱ्यांना दिवाळीनंतर भाव वाढेल असे वाटत होते.
मात्र तसे काही घडले नाही अजूनही कापसाचे भाव दबावातच आहेत. पण अशा या संकटाच्या काळात कापूस उत्पादकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि गोड बातमी समोर आली आहे.
मॉन्सूनोत्तर पाऊस आणि बोंडअळीमुळे कापसाचे उत्पन्न घटलं असल्याने आणि चांगल्या कापसाची उपलब्धता कमी असल्याने बाजार भाव वाढण्याची शक्यता आहे. एकीकडे कापसाची मागणी वाढू लागली आहे तर दुसरीकडे कापसाचे उपलब्धता कमी आहे.
सध्या देशांतर्गत प्रक्रियेकामी चांगल्या कापसाची उपलब्धता होत नाहीये. याचा परिणाम म्हणून फेब्रुवारी अखेर किंवा मार्चमध्ये कापसाच्या दरात सुधारणा होईल अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.
या क्षेत्रातील जाणकार लोकांनी कापसाचे भाव सात हजार रुपये प्रतिक्विंटल किंवा यापेक्षा अधिक होतील अशी आशा व्यक्त केली आहे. त्यामुळे आता जाणकार लोकांचा हा अंदाज खरा ठरतो का हे पाण्यासारखे राहणार आहे.