Cotton Rate : महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकाची जळगावसहित संपूर्ण खानदेश, विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. अर्थातच आपल्या राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे या पिकावर अर्थकारण अवलंबून आहे.
मात्र गेल्या दोन वर्षांपासून कापसाला बाजारात अपेक्षित असा भाव मिळत नाहीये. यामुळे, कापूस उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या चालू हंगामात देखील कापसाचे बाजार भाव खूपच दबावात आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी कापसाच्या बाजारभाव शंभर ते दोनशे रुपयांची किंचित वाढ नमूद करण्यात आली आहे. पण, अजूनही शेतकऱ्यांच्या अपेक्षाप्रमाणे बाजारात भाव मिळत नाहीये.
शेतकरी बांधव सांगतात की कापसाला किमान आठ ते नऊ हजाराचा भाव मिळाला पाहिजे. सध्या मात्र कापसाचे बाजार भाव सात हजार रुपये प्रति क्विंटल आसपास पाहायला मिळत आहे.
काही ठिकाणी कापसाच्या कमाल बाजारभावाने 7500 रुपयांचा टप्पा घातला आहे मात्र सरासरी बाजार भाव अजूनही सात हजाराच्या आसपास आहेत.
अशा परिस्थितीत मार्च 2024 मध्ये पांढरे सोने काय भावात विकले जाणार हा मोठा सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान याच बाबत बाजार अभ्यासकांनी मोठी माहिती दिली आहे. बाजार अभ्यासाकांनी म्हटल्याप्रमाणे येत्या दोन आठवड्यात कापसाचे भाव आणखी 200 ते 300 रुपयांनी वाढू शकतात.
कापसाचे सरासरी बाजार भाव मार्च 2024 मध्ये 7500 प्रतिक्विंटल पर्यंत जाण्याची शक्यता बाजार अभ्यासकांनी वर्तवली आहे. साहजिकच सरासरी बाजार भाव वाढले तर याचा फायदा बहुतांशी शेतकऱ्यांना होणार आहे.
बाजार अभ्यासकांनी म्हटल्याप्रमाणे सध्या जागतिक बाजारात कापसाला भारतीय बाजारापेक्षा अधिकचा भाव मिळतोय. भारतीय कापूस सध्या स्वस्तात उपलब्ध होत आहे. त्यामुळे भारतीय कापसाला जागतिक बाजारात मागणी आली आहे.
साहजिकच आता देशांतर्गत कापसाला मागणी आली असल्याने, याला उठाव मिळत असल्याने कापसाला चांगला भाव सुद्धा मिळणार असे चित्र आहे.