Cotton Rate Will Hike : सध्या कापसाचे दर दबावत आहेत. राज्यातील बहुतांशी बाजार समितीमध्ये कापूस दर 8 हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास स्थिरवले आहेत. नोव्हेंबर महिन्यात 9 हजार रुपये ते साडेनऊ हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यान विक्री होणारा कापूस 8,000 वर येऊन ठेपला असल्याने कापूस उत्पादकांची आर्थिक कोंडी होत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान आता आंतरराष्ट्रीय बाजारातून कापूस उत्पादकांसाठी सुखद अशी बातमी समोर येत आहे. जागतिक बाजारात गेल्या काही दिवसांपासून प्रत्यक्ष खरेदी आणि वायद्यांमध्ये कापूस दर तेजीत आले आहेत. चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये कापसाची आयात वाढणार असा अंदाज वर्तवला गेल्याने ही तेजी बाजारात आली असल्याचे जाणकारांनी नमूद केले आहे.
जागतिक बाजारात जरी तेजी असली तरी देखील देशांतर्गत बाजारात मंदी कायमच आहे. याबाबत जाणकार लोकांना विचारले असता, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या अर्थसंकल्पाचा काळ आहे, अर्थसंकल्पाच्या काळात सहसा बाजारात शांतताच असते. अर्थसंकल्पानंतर मात्र कापूस बाजारात उभारी येणार आहे. खरं पाहता देशातील सूतगिरण्या आणि कापड उद्योगाने कापूस आयातीवरील 11% शुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे.
मात्र याबाबत सरकार निर्णय घेणार नसल्याचे शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. कापडं उद्योगाने करात सवलत आणि सूत आणि कापड निर्यातीसाठी अनुदान देण्याची मागणी देखील केली आहे, या मागणीला मात्र शेतकऱ्यांनी देखील पाठिंबा दिला आहे. सुत आणि कापडाची निर्यात जर वाढली तर याचा कापूस दरावर देखील सकारात्मक परिणाम होतो यामुळे शेतकरी या मागणीसाठी उद्योगांसोबत उभे आहेत.
खरं पाहता सध्या स्थितीला अर्थसंकल्प सुरू असून उद्योगांना सरकारच्या धोरणाची स्पष्टता हवी आहे. यामुळे एकदा की अर्थसंकल्प झाला की मग बाजारात उभारी येईल हे नक्की. काल झालेल्या लिलावाचा जर विचार केला तर काल देशांतर्गत बाजारात एक लाख कापूस गाठींची आवक झाली आणि दर आठ हजार ते आठ हजार 500 प्रतिक्विंटल नमूद करण्यात आलेत.
राज्यात मात्र आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत कापसाने मजल मारली नाही. आठ हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटलच्या आसपासच काल बाजार भाव राज्यात नमूद झाले. दरम्यान आता देशात येत्या काही दिवसात विशेषता अर्थसंकल्पानंतर कापूस दरात वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जागतिक बाजारात तेजी आली आहे.
चीनकडून वाढणारी मागणी तसेच पाकिस्तान मध्ये देखील कापसाची मागणी वाढणार असल्याचे चित्र आहे. पाकिस्तानमध्ये कापसाचे उत्पादन कमी झाले असल्याने त्या ठिकाणी कापसाची आयात वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय भारतातून निर्यात वाढण्याचे चित्र निर्माण होत आहे.
अशा परिस्थितीत कापूस दरात सुधारणा होणार असून आगामी काही दिवसात 8500 ते 9500 रुपये प्रति क्विंटल दरम्यान कापसाला दर मिळणार असल्याचा अंदाज तज्ञ लोकांनी बांधला आहे. निश्चितच लवकरच कापूस दर दहा हजार रुपये प्रति क्विंटलच्या घरात जाणार आहेत. यामुळे कापूस उत्पादकांना दिलासा मिळेल असं चित्र निर्माण होत आहे.