Cotton Rate : महाराष्ट्रात कापूस (Cotton Crop) आणि सोयाबीन हे खरीप हंगामातील दोन मुख्य पिके आहेत. या दोन मुख्य पिकांवर महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकऱ्यांचे (Farmer) अर्थकारण अवलंबून असते. गेल्या वर्षी कापसाला आणि सोयाबीनला चांगला उच्चांकी बाजार भाव मिळाला असल्याने यावर्षी देखील कापसाला तसेच सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना लागून आहे.
सध्या बाजारात कापसाचे आणि सोयाबीनची विक्री सुरू आहे. राज्यातील अनेक ठिकाणी कापसाची खरेदी सुरू झाली आहे. मुहूर्ताच्या कापसाला चांगला बाजार भाव (Cotton Market Price) देखील मिळत आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीनचा विचार केला तर या वर्षी सोयाबीनच्या दरात सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे.
गेल्या वर्षी सोयाबीन सहा हजार रुपये प्रतिक्विंटल पेक्षा अधिक दराने विक्री होत होता. मात्र या वर्षी सोयाबीन पाच हजारांपेक्षाही खाली आला आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांची दरवाढीची आशा फोल ठरली आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षी सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपासच बाजार भाव मिळणार आहे.
यामुळे निश्चितच सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांची डोकेदुखी वाढत आहे. दरम्यान, कापूस खरेदीच्या मुहूर्ताला उच्चांकी बाजार भाव (Cotton Bazar Bhav) मिळाला खरी मात्र हा बाजार भाव चिरकाल टिकून राहील का? हंगाम संपेपर्यंत हा बाजार भाव कायम राहील का? हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना (Farmer) भेडसावत आहे.
अशा परिस्थितीत आज आपण यावर तज्ञांचे मत काय याविषयी जाणून घेण्याचा थोडक्यात पण सविस्तर प्रयत्न करणार आहोत. तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कापूस नेमका केव्हा विक्री करावा याविषयी देखील आढावा घेण्याचा प्रयत्न करूया.
कापसाला किती मिळतोय दर
सध्या कापसाच्या बाजार भावात चढ-उतार सुरू आहे. दरम्यान ग्रामीण भागात अनेक ठिकाणी दसऱ्याच्या मुहूर्तावर कापसाच्या खरेदीला सुरुवात झाली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर कापूस खरेदीला उच्चांकी बाजार भाव मिळाला आहे. कापसाला अनेक ठिकाणी अकरा हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास बाजार भाव मिळाला आहे. मुहूर्ताला मिळालेला हा उच्चांकी बाजार भाव निश्चितच कापूस उत्पादक शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर हसू आणत आहे.
भविष्यात दर टिकून राहतील का? आणि कापसाची विक्री केव्हा करावी?
सध्या कापसाला समाधानकारक बाजार भाव मिळत आहे. मात्र यामध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत नवा कापूस जेव्हा बाजारात दाखल होईल तेव्हा बाजारात कापसाचे मोठ्या प्रमाणात आवक निर्माण होणार आहे. आवक वाढली म्हणजेच बाजार भाव कमी होतो. आवकेचा दबाव कापसाचे बाजार भाव कमी करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो.
हीच बाब लक्षात घेऊन कापड उद्योग कापसाची खरेदी करण्यासाठी बाजारात उतरू शकतात. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनी या वर्षी टप्प्याटप्प्याने आणि बाजारपेठेतील स्थिती जाणून कापसाची विक्री करणे योग्य राहणार आहे. बाजारात अधिक आवक होणार नाही याची काळजी जर शेतकरी बांधवांनी घेतली तर निश्चितच बाजार भाव बराच काळ टिकून राहतील.
असे जाणकार लोकांनी मत व्यक्त केले आहे. आपल्या माहितीसाठी आम्ही या ठिकाणी नमूद करू इच्छितो की सध्या बाजारपेठेत कापसाला साडेसात हजार रुपये प्रतिक्विंटल ते दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा बाजार भाव मिळत आहे.