Cotton Rate : कपाशी हे महाराष्ट्रात उत्पादीत होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. याची लागवड राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कापसाचे पीक शेतकऱ्यांना परवडत नसल्याची वास्तविकता आहे. या पिकातून शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पादन तर मिळतच नाहीये शिवाय अपेक्षित भावही मिळत नाहीये.
त्यामुळे शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होत आहे. कापसाची एकरी उत्पादकता विविध कारणांमुळे कमी होत चालली आहे. तसेच, गेल्या दोन वर्षांमध्ये कापसाला बाजारपेठांमध्ये अपेक्षित दर मिळालेला नाही.
काही बाजारांमध्ये अक्षरशः हमीभावापेक्षा कमी दरात कापसाची विक्री करावी लागली आहे. यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. तथापि, कापसाला इतर पिकांचा पर्याय उपलब्ध नसल्याने अनेक शेतकरी बांधव आजही खरिपात कापसाचीच लागवड करण्याला प्राधान्य दाखवतात.
दरम्यान, जर तुम्हीही यंदाच्या खरीप हंगामात कापूस लागवड केली असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. खरेतर यावर्षी कापूस लागवडीखालील क्षेत्र थोडेसे कमी झाले आहे.
सतत दोन वर्षे कापसाला अपेक्षित भाव न मिळाल्याने नाराज झालेल्या शेतकऱ्यांनी आपला मोर्चा आता दुसऱ्या पिकांकडे वळवला आहे. याशिवाय हवामान बदलांमुळे कापूस पिकावर विविध किडींचा आणि रोगराईचा प्रादुर्भाव देखील पाहायला मिळत आहे.
त्यामुळे यंदाच्या उत्पादनात देखील मोठी घट येणार आहे. परिणामी यंदा कापसाला चांगला दर मिळणार अशी भोळी-भाबडी अशा शेतकऱ्यांना लागली आहे. खरंच यंदा कापसाला चांगला दर मिळणार का हा मोठा सवाल आहे.
दरम्यान याच संदर्भात शेती क्षेत्रातील जाणकारांनी मोठी माहिती दिली आहे. जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे, कापसाचे क्षेत्र कमी झाले आहे त्याबरोबरच कापूस उत्पादकता सुद्धा कमी होणार आहे.
त्यामुळे कापसाचे दर वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. मात्र जागतिक स्तरावरील मंदीमुळे कापसाची मागणी कमी झाली आहे. यामुळे यंदाही कापसाचे दर दबावातचं राहतील अशी भविष्यवाणी जाणकारांनी केली आहे.
यंदाच्या हंगामात कापसाला ६५०० रुपयांपेक्षा अधिकचा दर मिळणार नाही, असे कृषी क्षेत्रातील काही तज्ञांनी यावेळी आवर्जून नमूद केले आहे.
म्हणून शेतकऱ्यांना ७५०० रुपयांचा हमीभाव मिळावा याकरिता शासनाने हस्तक्षेप करण्याची गरज असल्याची बाब सुद्धा अधोरेखित केली जात आहे. यामुळे यंदा कापसाला नेमका किती भाव मिळतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.