Cotton Rate : तुम्ही यंदाच्या खरीप हंगामात कापसाची लागवड केली आहे का ? अहो, मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. खर तर ज्या शेतकऱ्यांनी यंदा कापसाची लागवड केली आहे त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून यंदा कापसाचा बाजारभाव कसा राहणार याबाबत विचारणा केली जात आहे.
दरवर्षी विजयादशमीपासून म्हणजेच दसऱ्यापासून कापसाचा नवीन माल बाजारात येत असतो. विजयादशमीच्या दिवसांमध्ये बाजारात नवीन कापसाची आवक वाढत असते.
तत्पूर्वी मात्र कापसाची खरेदी सुरू होते. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तापासून कापसाची खरेदी सुरू केली जाते. यंदाही कापूस आगार म्हणून संपूर्ण जगात ख्यातनाम असणाऱ्या खानदेश मध्ये कापसाची खरेदी सुरू झाली आहे.
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर खानदेश येथील धरणगाव मध्ये सुरू झालेल्या कापूस खरेदी कापसाला कमाल 7156 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे. कापूस खरेदीच्या मुहूर्तावर कापसाला समाधानकारक भाव मिळाला असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत आहे.
तथापि शेतकऱ्यांना कापसाला किमान दहा हजाराचा भाव मिळायला पाहिजे अशी आशा आहे. दोन वर्षांपूर्वी कापसाला बाजारात दहा हजाराचा भाव मिळाला होता.
यामुळे यंदाही असाच विक्रमी दर मिळायला हवा अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. दरम्यान बाजार अभ्यासकांनी यंदा कापसाला काय भाव मिळणार या संदर्भात अंदाज वर्तवले जात आहेत. यंदा कापसाचा हंगाम हा शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून चांगला राहण्याची शक्यता आहे.
पण, जागतिक परिस्थिती, गुजरात व तेलंगणामधील पूरस्थिती या सर्व गोष्टींचा विचार केला असता यंदाही कापसाचे दर दहा हजारापर्यंत जाणार नसल्याचे दिसत आहे. यंदा कापसाचे भाव साडेआठ हजार रुपयांच्या आतच राहण्याची शक्यता बाजारातील अभ्यासकांच्या माध्यमातून वर्तवली जात आहे.
यामुळे जर तुम्हीही कापूस लागवड केली असेल तर गेल्या वर्षी उत्पादित झालेल्या कापसाच्या तुलनेत यंदा कापसाला अधिकचा भाव मिळणार असे चित्र दिसत आहे. तथापि जेव्हा विजयादशमीपासून नवीन कापसाची आवक वाढेल तेव्हा बाजारात कापूस दर कसे राहतात हे पाहण्यासारखें ठरणार आहे.