Cotton Rate : कपाशी अर्थातच कापूस या पिकाची राज्यातील मराठवाडा विदर्भ आणि खानदेश या तीन विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. कापसाची खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात लागवड होते.
या पिकाची राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये शेती केली जाते. कापसाच्या शेतीवर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. दरवर्षी विजयादशमी नंतर नवीन कापसाची आवक वाढत असते.
यंदाही विजयादशमी अर्थातच दसऱ्यापासून कापसाची आवक वाढत असून सध्या राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये कापूस विक्रीसाठी बाजारात दाखल होताना नजरेस पडत आहे. तथापि अजूनही कापसाची आवक म्हणावी तशी वाढलेली नाही.
अशा या परिस्थितीत अनेकांच्या माध्यमातून सध्या कापसाला काय दर मिळतोय. मराठवाडा, विदर्भ की खानदेश कोणत्या विभागात कापसाला सर्वाधिक भाव मिळतोय असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान आज आपण कापसाला राज्यातील कोणत्या बाजारांमध्ये सर्वात जास्त भाव मिळतो या संदर्भात माहिती पाहणार आहोत.
कापसाला कुठे मिळतोय सर्वाधिक भाव
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार राज्यातील खानदेश विभागातील नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला सर्वाधिक भाव मिळतोय.
कालचा लिलावात नंदुरबार एपीएमसी मध्ये कापसाला किमान 6550, कमाल 7355 आणि सरासरी 7200 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे. तसेच मराठवाडा विभागातील सिंधी सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लांब धाग्याच्या कापसाला किमान 6950, कमाल 7250 आणि सरासरी 7200 असा दर मिळाला आहे.
विदर्भ विभागातील वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मध्यम धाग्याच्या कापसाला किमान 7000, कमाल 7200 आणि सरासरी 7000 100 असा भाव मिळाला आहे.
तसेच पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कालच्या लिलावात कापसाला किमान 7000, कमाल 7150 आणि सरासरी 7050 असा भाव मिळाला आहे.
पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला किमान 6700, कमाल 7000 आणि सरासरी 6850 असा भाव मिळाला आहे.
काटोल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला किमान 6800, कमाल 7000 आणि सरासरी 7000 असा दर मिळाला आहे.
वरोरा शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला किमान 6000, कमाल 7100 आणि सरासरी 6500 असा दर मिळाला आहे.
उमरेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला किमान 6,970, कमाल 7 हजार 90 आणि सरासरी 7 हजार 30 असा दर मिळाला आहे.
समुद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला किमान 7000, कमाल 7200 आणि सरासरी 7050 असा भाव मिळाला आहे.
सावनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला किमान 7000, कमाल 7 हजार 65 आणि सरासरी 7 हजार 30 असा दर मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे.