Cotton Rate : कापूस हे खानदेश, मराठवाडा आणि विदर्भात उत्पादित केले जाणारे एक महत्त्वाचे पीक आहे. खानदेशातील जळगाव जिल्हा हा कापूस उत्पादनासाठी संपूर्ण जगात ख्यातनाम आहे. येथे दरवर्षी श्री गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापसाची खरेदी सुरू होत असते. मात्र नव्या कापसाची आवक खऱ्या अर्थाने विजयादशमीपासून वाढत असते.
तथापि ज्या शेतकऱ्यांनी कापसाची अर्ली लागवड केलेली असते त्या शेतकऱ्यांचा माल गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर बाजारात दाखल होतो. यंदाही ज्या शेतकऱ्यांनी कापसाची लवकर लागवड केलेली होती त्या शेतकऱ्यांचा कापूस आता बाजारात येऊ लागला आहे.
विशेष म्हणजे खानदेशात कापसाची खरेदी सुरू देखील झाली आहे. अशा परिस्थितीत आज आपण यंदा बाजारात नवीन आणि जुन्या कापसाला काय भाव मिळतो या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खानदेशात नवीन कापसाला काय दर मिळतोय
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर खानदेशातील धरणगाव येथे कापूस खरेदीचा श्री गणेशा झाला. यावेळी अडीच हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली. यामध्ये नवीन आणि जुन्या कापसाचा समावेश होता. महत्त्वाचे म्हणजे खरेदीच्या पहिल्याच दिवशी मुहूर्ताच्या नवीन कापसाला 7153 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.
तसेच जुन्या कापसाला आठ हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. धरणगाव तालुक्यातील श्रीजी जिनिंग उद्योगात गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापूस खरेदी सुरू होत असते. यंदाही गणरायाच्या आगमनाचे औचित्य साधून श्रीजी जिनिंगकडून कापूस खरेदी सुरू करण्यात आली.
पहिल्याच दिवशी कापसाचे 2500 क्विंटल एवढी खरेदी करण्यात आली. यावेळी नवीन मालाला 7153 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला असल्याची माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली.
एकंदरीत गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मुहूर्ताच्या कापसाला खानदेश मध्ये अधिक भाव मिळाला आहे. यामुळे यंदाचा कापूस हंगाम हा शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून फायद्याचा राहील असे चित्र सध्या तरी दिसत आहे.
तरीही शेतकऱ्यांच्या माध्यमातून यंदा कापसाला काय भाव मिळणार, गेल्या दोन वर्षांपासून कापसाचे भाव दहा हजार रुपयाला टच झालेले नाहीत. यामुळे यंदा तरी तसा विक्रमी दर मिळणार का? असे काही प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहेत.
दरम्यान बाजार अभ्यासकांनी यावर्षी कापसाचे दर 10 हजाराला टच होणार नाहीत मात्र 8500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचू शकतात असे म्हटले आहे. तथापि यासंदर्भात आत्ताच भविष्यवाणी करणे थोडे अवघड आहे.
जेव्हा कापसाच्या उत्पादनाबाबत योग्य ती आकडेवारी समोर येईल तेव्हाच कापसाला यंदा काय भाव मिळणार याबाबत योग्य तो अंदाज बांधता येणार आहे. पण, सध्याची परिस्थिती पाहिली असता कापसाला साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव मिळणे अपेक्षित आहे.