Cotton Rate : दोन वर्षांपूर्वी कापसाला चांगला भाव मिळाला होता. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कापसाचे बाजार भाव दबावात आहेत. यंदा तर अनेक शेतकऱ्यांना आपला माल हमीभावापेक्षा कमी दरात विकावा लागला आहे. यामुळे पिकासाठी आलेला खर्च देखील शेतकऱ्यांना भरून काढता आलेला नाही ही शोकांतिका आहे.
तथापि कापसाला इतर दुसरा पर्याय नसल्याने यंदाही मोठ्या प्रमाणात कापूस लागवड होणार असा अंदाज आहे. हवामान खात्याने यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज दिला असून यंदा राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश मध्ये मोठ्या प्रमाणात कापूस लागवड होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान आज आपण हंगामाच्या अंतिम टप्प्यात कापसाला काय भाव मिळत आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. राज्यातील कोणत्या बाजारांमध्ये कापसाला चांगला दर मिळाला आहे याविषयी आता आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
सिंदी सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती : आज या मार्केटमध्ये मध्यम स्टेपल कापसाला किमान 6600 रुपये प्रति क्विंटल, कमाल 7600 रुपये आणि सरासरी 7500 रुपये एवढा दर मिळाला आहे. या मार्केटमध्ये आज कापसाला सर्वाधिक भाव मिळाला आहे.
वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कापसाला किमान 5,100, कमाल 7525 आणि सरासरी सात हजार रुपये एवढा भाव मिळाला आहे.
घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समिती : मिळालेल्या माहितीनुसार आज या एपीएमसीमध्ये कापसाला किमान 7200, कमाल 7450 आणि सरासरी 7350 असा भाव मिळाला आहे.
आष्टी वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कापसाला किमान 6,950, कमाल 7400 आणि सरासरी 7250 असा भाव मिळाला आहे.
उमरेड कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कापसाला किमान 7100, कमाल 7320 आणि सरासरी 7200 असा भाव मिळाला आहे.
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कापसाला किमान 6500, कमाल 7300 आणि सरासरी 6900 असा भाव मिळाला आहे.
देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कापसाला किमान 6800, कमाल 7300 आणि सरासरी 7200 असा भाव मिळाला आहे.
वरोरा खांबाडा कृषी उत्पन्न बाजार समिती : मिळालेल्या माहितीनुसार, या मार्केटमध्ये आज कापसाला किमान 6000 रुपये प्रति क्विंटल, कमाल 7200 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 6900 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.