Cotton Rate : गेल्या दोन वर्षांपासून कापूस या नगदी पिकाला बाजारात अपेक्षित भाव मिळत नाहीये. गेल्यावर्षी अर्थातच 2023 च्या खरीप हंगामात उत्पादित झालेल्या कापसाला देखील अपेक्षित भाव मिळाला नव्हता.
त्यावेळी परिस्थिती एवढी बिकट बनली होती की राज्य शासनाला कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदानाची घोषणा करावी लागली होती. गेल्यावर्षी उत्पादित केलेल्या कापसाच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळाली आहे.
यंदा तरी कापसाला चांगला भाव मिळेल अशी शेतकऱ्यांना होती. मात्र यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच कापसाचे दर दबावात आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून पिकासाठी आलेला खर्च कसा भरून काढायचा हा मोठा प्रश्न आहे.
दिवाळीच्या काळात राज्यातील अनेक बाजारांमध्ये कापसाचे दर दबावात पाहायला मिळालेत. ज्या ठिकाणी दिवाळीच्या काळात लिलाव झाले तिथे कापसाचे दर पूर्णपणे दबावात होते. दरम्यान दिवाळीनंतर काल चार नोव्हेंबर 2024 ला झालेल्या लिलावात राज्यातील विदर्भ विभागातील वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कापसाला सर्वाधिक दर मिळाल्याची नोंद करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार कालचा लिलावात वर्धा एपीएमसी मध्ये कापसाला सर्वाधिक कमाल सात हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला आहे.
या बाजारात कापसाला किमान 6800 आणि सरासरी 7000 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे. दरम्यान आता आपण राज्यातील इतर बाजारांमधील कापूस बाजार भाव थोडक्यात जाणून घेणार आहोत.
राज्यातील प्रमुख बाजारात कापसाला काय भाव मिळाला
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कापसाला किमान 6400, कमाल 7175 आणि सरासरी 6850 असा भाव झाला आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती : विदर्भातील या मार्केटमध्ये कापसाला किमान 6 हजार 750, कमाल 7000 आणि सरासरी 6810 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती : मराठवाड्यातील या प्रमुख बाजारात कापसाला सर्वात कमी भाव मिळाला असल्याची नोंद राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर करण्यात आली आहे. या बाजारात कापसाला किमान 6450, कमाल 6,600 आणि सरासरी 6525 असा भाव मिळाला आहे.