Cotton Rate : यावर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली. हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे, यंदाच्या मान्सून काळात राज्यात सरासरीपेक्षा 12 टक्के कमी पाऊस झाला आहे.
यामुळे राज्यावर दुष्काळाचे ढग दाट झाले आहेत. दुष्काळामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. कमी पावसामुळे कापूस, सोयाबीन, मका यासहित सर्वच पिकांच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात आहेत.
विशेष म्हणजे उत्पादनात घट आलेली असतानाही सध्या बाजारात कापसाला अपेक्षित असा भाव मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या हंगामातही कापसाला अपेक्षित असा भाव मिळाला नव्हता.
पण, गेल्या हंगामात अंतिम टप्प्यात कापूस आठ हजार रुपये प्रति क्विंटल च्या आसपास विकला गेला होता. या चालू हंगामात मात्र कापसाला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे.
केंद्र शासनाने मध्यम धाग्याच्या कापसासाठी 6620 रुपये तर लांब धाग्याच्या कापसासाठी सात हजार वीस रुपये प्रतिक्विंटल एवढा हमीभाव जाहीर केला आहे. पण सध्या स्थितीला कापसाला जाहीर करण्यात आलेल्या हमीभावापेक्षाही कमी दर मिळतोय.
पुणे जिल्ह्यातील बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कापसाला हमीभावापेक्षा कमी दर मिळाला. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीच भर पडली आहे. हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने आता पिकासाठी आलेला खर्च कसा वसूल करायचा हाच सवाल शेतकऱ्यांच्या पुढ्यात आहे.
राज्यातील प्रमुख बाजारातील कापसाचे भाव
सावनेर एपीएमसी : या एपीएमसी मध्ये कापसाला किमान 6,600 कमाल 6,725 आणि सरासरी 6,725 एवढा दर मिळाला आहे.
भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समिती : या एपीएमसी मध्ये कापसाला किमान 6800 कमाल 7000 आणि सरासरी 6900 एवढा भाव मिळाला.
अकोला (बोरगाव मंजू) कृषी उत्पन्न बाजार समिती : या एपीएमसी मध्ये कापसाला किमान 6,964, कमाल 7500 आणि सरासरी 7232 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.
बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती : या एपीएमसी मध्ये कापसाला हमीभावापेक्षा कमी दर मिळाला आहे. येथे कापसाला किमान 4,600 कमाल 6,600 आणि सरासरी 6,501 रुपये प्रतिक्विंटल एवढा भाव मिळाला आहे.