Cotton Rate : कापसाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरे तर गेल्या वर्षी कापसाला आणि सोयाबीनला बाजारात फारच कवडीमोल भाव मिळाला. दुसरीकडे, कमी पावसामुळे या दोन्ही पिकांच्या उत्पादनातही मोठी घट आली होती. यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले होते.
गेल्या वर्षी शेतकऱ्यांची परिस्थिती एवढी बिकट बनली होती की कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने थेट अनुदानाची घोषणा केली आहे. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून हेक्टरी पाच हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.
हे अनुदान दोन हेक्टर च्या मर्यादेत मिळणार आहे. गेल्या वर्षी कापसाला बाजारात अपेक्षित दर मिळाला नाही तरीही यंदा कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे यावर्षी उत्पादित झालेला नवीन कापूस आता बाजारात येऊ लागला आहे.
कापूस पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यात नवीन कापसाची आवक सुरू झाली असून नवीन कापसाला सात हजार 153 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला आहे. मात्र नवीन कापसाची आवक ही विजयादशमीपासून वाढणार आहे.
सध्या ज्या शेतकऱ्यांनी लवकर कापसाची लागवड केली होती त्यांचा माल बाजारात येत आहे. मात्र कापसाची खरी आवक ही दसऱ्यापासून सुरू होणार आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रात मुहूर्ताच्या कापसाला सात ते नऊ हजार पर्यंतचा दर मिळाला होता.
मात्र नंतर कापसाचे भाव कमी झालेत. अगदीच सहा ते साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटल या दरात कापूस विक्री करावा लागला. म्हणजेच गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दरात कापसाची विक्री केली.
यामुळे पिकासाठी आलेला खर्च देखील अनेकांना भरून काढता आला नाही. अशा परिस्थितीत यंदा कापसाला काय दर मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. विशेष बाब अशी की यासंदर्भात आता बाजारातील अभ्यासकांनी देखील अंदाज वर्तवला आहे.
बाजारातील अभ्यासकांनी सांगितल्याप्रमाणे यंदा कापूस पिकासाठी हवामान खूपच पोषक आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. जिनिंग उद्योगांच्या मते यंदा पंचवीस लाख गाठींची निर्मिती होईल.
तसेच खुल्या बाजारात शेतकऱ्यांच्या कापसाला सात हजार ते सात हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल असा बाजार भाव मिळेल असा दावा काही व्यापाऱ्यांकडून करण्यात आला आहे. पण व्यापाऱ्यांचा आणि बाजार अभ्यासकांचा हा अंदाज कितपत खरा ठरतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.