Cotton Rate : गेल्या दोन वर्षांपासून कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. गेल्या वर्षी तर कापूस पिकासाठी आलेला खर्च देखील शेतकऱ्यांना भरून काढता आला नव्हता. कारण म्हणजे उत्पादनात आलेली घट आणि उत्पादित झालेल्या मालाला अपेक्षित दर मिळाला नव्हता.
परिस्थिती एवढी बिकट होते की शासनाला कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्यावे लागले. यंदा मात्र तशी परिस्थिती राहणार नाही या अशाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे.
दरम्यान, नेहमीप्रमाणे विजयादशमी नंतर महाराष्ट्रात कापसाची आवक वाढू लागली आहे. दुसऱ्यानंतर दरवर्षी शेतकऱ्यांचा कापूस मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी दाखल होत असतो. त्यानुसार यंदाही शेतकऱ्यांचा कापूस विक्रीसाठी बाजारात येत आहे. मात्र सुरुवातीपासूनच कापसाचे दर दबावात आहेत.
आता मात्र बाजारभाव हळूहळू वाढताना दिसत आहेत. आठ हजाराच्या दिशेने कापसाची वाटचाल सुरू झाली आहे. काल राज्यातील एका प्रमुख बाजारात कापसाला सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे.
त्यामुळे आगामी काळात भाव आणखी वाढतील अशी शेतकऱ्यांची आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाली आहे. विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील देवळी येथील स्थानिक संजय इंडस्ट्रीज मध्ये काल अर्थातच 24 ऑक्टोबरला कापसाच्या खरेदीला सुरुवात करण्यात आली.
दिवाळीपूर्वीच या ठिकाणी कापसाची खरेदी सुरू झाली असल्याने आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून समाधान व्यक्त करण्यात आले. तसेच या ठिकाणी मुहूर्ताच्या कापसाला तब्बल सात हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल पेक्षा अधिकचा भाव मिळाल्यानेही शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त करण्यात आला.
कापूस खरेदीच्या शुभारंभावेळी या ठिकाणी संजय इंडस्ट्रिजचे संचालक नेमीचंद घिया, विनोद घिया व संजय घिया यांनी काटापूजन केले. तसेच, कापसाला 7 हजार 545 रुपये प्रती क्विंटल असा मुहूर्ताचा भाव घोषित केला.
यावेळी कापूस विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचा सत्कारही करण्यात आला. खरंतर कापूस हे विदर्भ, मराठवाडा आणि खांदेशात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी याची लागवड केली जाते.
राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण हे कापूस या पिकावर अवलंबून असल्याचे दिसते. मात्र गेल्या वर्षी शेतकऱ्यांना कापूस पिकाने चांगलाच दणका दिला होता. बाजारात अपेक्षित दर मिळाला नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र आता कापसाचे भाव हळूहळू वाढू लागले आहेत.
त्यामुळे आगामी काळातही तर तेजीत राहतील अशी आशा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. तथापि आगामी काळात जेव्हा बाजारांमध्ये कापसाचे आवक आणखी वाढेल तेव्हा कापसाला काय दर मिळतो हे विशेष पाहण्यासारखे ठरणार आहे.