Cotton Rate : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गेले दोन हंगाम खूपच कठीण राहिले आहेत. एकतर कृषी निविष्ठांच्या वाढलेल्या किमती, इंधनाचे वाढलेले दर, मजुरीचे वाढत असलेले दर यामुळे कापूस उत्पादनाचा खर्च हा सातत्याने वाढत आहे. दुसरीकडे गेल्या दोन वर्षांपासून कापसाला बाजारात अपेक्षित भाव मिळत नाहीये. यामुळे शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली असून हे पीक आता शेतकऱ्यांना परवडत नाहीये.
या चालू हंगामात तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. चालू हंगामात कमी पावसामुळे आणि हवामान बदलामुळे कपाशीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. दुसरीकडे बाजारात कापसाला पाहिजे तसा भावही मिळत नाहीये. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या वायद्यांमधील चढ उतार कायम असल्याचे चित्र आहे.
तसेच, कापसाचे वायदे काही आठवड्याच्या विश्रांतीनंतर थोडेसे सुधारले असून आता वायद्यात कापूस पुन्हा एकदा ८८ सेंटवर पोहचला आहे. याचा परिणाम देशातील वायदे बाजारातही दिसून आला आहे. देशातील वायदे बाजारातील भावपातळी ही ६१ हजार ८०० रुपये प्रतिखंडीवर आली आहे.
मात्र बाजार समित्यांमधील भावपातळीत अजूनही काही प्रमाणात चढ उतार सुरु आहेत. खरे तर आता कापसाचा हंगाम जवळपास अंतिम टप्प्यात आला आहे. आता खूपच कमी शेतकऱ्यांकडे माल शिल्लक आहे. तथापि जर कापसाला चांगला भाव मिळाला तर ज्या शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे त्यांना तरी दिलासा मिळेल अशी आशा आहे.
पण, सध्या बाजार समित्यांमध्ये आज कापसाला सरासरी ७ हजार ४०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. शेतकऱ्यांची किमान नऊ ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळायला पाहिजे अशी अपेक्षा आहे.
दरम्यान बाजारातील तज्ञ लोकांनी कापूस बाजारात आणखी काही दिवस अशीच चढ-उतार सुरु राहणार असा अंदाज दिला आहे. आता आपण आज राज्यातील प्रमुख बाजारांमध्ये कापसाला काय भाव मिळाला आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कापसाला किमान, कमाल आणि सरासरी आठ हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला आहे.
देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कापसाला किमान 7000, कमाल 7815 आणि सरासरी 7615 रुपये असा भाव मिळाला आहे.
सिंधी सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कापसाला किमान 6500, कमाल 7765 आणि सरासरी 7620 असा भाव मिळाला आहे.
मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कापसाला किमान 6950, कमाल 7750 आणि सरासरी 7350 चा भाव मिळाला आहे.
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कापसाला किमान 7,100, कमाल 7500 आणि सरासरी 7300 असा भाव मिळाला आहे.
उमरेड कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कापसाला किमान 7000, कमाल 7470 आणि सरासरी 7150 असा भाव मिळाला आहे.