Cotton Rate News : कापसाचा हंगाम यंदा विजयादशमीला सुरू झाला. विजयादशमीला नवीन मालाची बाजारात आवक सुरू झाली. हंगामाच्या सुरुवातीला कापसाचा कमाल भाव 7500 रुपये प्रति क्विंटलचा आसपास होता. यानंतर मात्र कापसाचे भाव हमीभावापेक्षा कमी झालेत.
यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता कुठे कापसाचे कमाल भाव देशांतर्गत बाजारपेठेत 8 हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. तसेच सरासरी बाजार भावाने देखील 7300 ते 7800 प्रतिक्विंटलचा टप्पा गाठला होता.
अशातच, मात्र युएडीएने कापूस उत्पादनाचा एक नवीन अंदाज व्यक्त केला आहे. यामध्ये देशांतर्गत आणि जागतिक कापूस उत्पादन वाढेल असा अंदाज दिला गेला आहे. दुसरीकडे, कापसाचा वापर देखील वाढणार असे या संस्थेने म्हटले आहे.
भारतात कापसाचे उत्पादन, कापसाचा वापर आणि कापसाची निर्यात वाढणार असे यु ए डी ए ने सांगितले आहे. दुसरीकडे देशांतर्गत बाजारात कापसाची आवक कमी होत आहे. काल देशांतर्गत 80 हजार गाठींपेक्षा कमी आवक झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
यामुळे देशांतर्गत सध्या स्थितीला बाजार भाव टिकून असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे खेडा खरेदीत देखील कापसाला सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव मिळत आहे.
मात्र काही ठिकाणी अजूनही 7500 प्रतिक्विंटल पेक्षा कमी दर मिळतोय.सध्याचा भाव कापसाची गुणवत्ता आणि बाजारांमधील आवक यावर अवलंबून असल्याचे पाहायला मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून युएसएडीएचा अंदाज कसा राहणार याकडे लक्ष लागले होते. आता हा अंदाज समोर आला आहे. यामुळे आता यानंतर काय बाजार भाव मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातो.
तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, बाजार अभ्यासकांनी मार्च महिन्यात कापसाला आठ हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा सरासरी बाजार भाव मिळू शकतो असा अंदाज दिला आहे.
मात्र असे असले तरी शेतकऱ्यांनी आपल्या मालाची विक्री करताना बाजारातील घडामोडींकडे विशेष लक्ष असू देणे आवश्यक आहे. बाजारातील घडामोडी लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या मालाच्या विक्रीचे नियोजन या ठिकाणी केल्यास त्यांना याचा लाभ मिळणार आहे.
एकंदरीत, मार्च महिन्यात आठ हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास सरासरी भाव मिळेल असे बाजार अभ्यासकांनी म्हटले आहे. तसेच, शेतकऱ्यांनी कापूस विक्री करताना बाजारातील चढ-उताराकडेही विशेष लक्ष असू द्यावे, असे आवाहन कापूस बाजारातील अभ्यासकांनी यावेळी केले आहे.