Cotton Rate : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्यातील बहुतांशी शेतकरी बांधव कपाशीची लागवड करत असतात. कपाशीला नगदी पिकाचा दर्जा मिळालेला आहे. दरम्यान राज्यातील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची अपडेट समोर येत आहे.
ती म्हणजे कापसाच्या देशांतर्गत वायदे बाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहे. यामुळे याचा परिणाम आता देशातील बाजारावर देखील पाहायला मिळतोय. देशांतर्गत बाजारात देखील कापसाचे बाजारभावात चढ-उतार सुरू असून यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
वास्तविक, गेल्या काही दिवसानंतर कापसाच्या बाजारभावात थोडीशी सुधारणा पाहायला मिळाली होती. यामुळे राज्यातील प्रमुख कापूस उत्पादक भागातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पहायाला मिळत होते.
अशातच मात्र वायद्यांमध्ये कापसाच्या भावात मागील आठवडाभर चढ-उतार पाहायला मिळाली आहे. पण, आठवड्याच्या शेवटी अर्थात शुक्रवारी वायदे बाजार थोड्याशा वाढीसह बंद झाला आहे.
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे 93.93 सेंट प्रति पाउंडवर होते तर देशातील वायदे 63 हजार 680 रुपये प्रति खंडीवर बंद झालेत. दुसरीकडे बाजार समित्यांमध्येही गेल्या आठवड्यात चढ उतार पाहायला मिळाली आहे.
गेल्या आठवड्यात अंतर्गत बाजार समितीमध्ये कापसाच्या बाजारभावात शंभर रुपयांपर्यंत चढ-उतार पाहायला मिळाली आहे. सरासरी बाजार भाव मात्र गेल्या आठवड्यात कायम राहिले आहेत.
महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न महामंडळाचे अधिकृत संकेतस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात कापसाची सरासरी भावपातळी 7400 प्रतिक्विंटल ते 7800 रुपये प्रति क्विंटल दरम्यान नमूद करण्यात आली आहे.
अर्थातच कापसाचे सरासरी भाव अजूनही 8000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा खालीच आहेत. मात्र, शेतकऱ्यांकडून किमान कापसाला 9000 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळाला पाहिजे होता असे मत व्यक्त होत आहे.
सध्या स्थितीला मात्र कापसाला शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे भाव मिळत नाही. विशेष बाब अशी की, कापसाच्या भावात आणखी काही दिवस देशांतर्गत बाजारात चढ-उतार पाहायला मिळणार असा अंदाज आहे.
तथापि, एप्रिल आणि मे महिन्यात कापसाला 8000 रुपये प्रति क्विंटल ते आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा सरासरी भाव मिळू शकतो असा अंदाज मागील काही दिवसांपूर्वी जाणकार लोकांनी व्यक्त केला होता. त्यामुळे आता कापसाला भविष्यात काय भाव मिळणार हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.