Cotton Rate : कापसाच्या बाजारभावात गेल्या काही दिवसात थोडीशी सुधारणा पाहायला मिळाली आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, काल कापसाला राज्यातील प्रमुख बाजारांमध्ये सरासरी 6500 ते 7875 रुपयांपर्यंत दर मिळाले आहेत.
तथापि, सध्याचा भाव हा शेतकऱ्यांसाठी फारसा परवडणारा नाहीये. असेच भाव राहिले तर यंदाच्या हंगामातून शेतकऱ्यांना फारशी कमाई होणार नाहीये. अशा परिस्थितीत, शेतकऱ्यांच्या माध्यमातून मार्च एप्रिल मे महिन्यात कापसाला काय भाव मिळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, आज आपण मार्च एप्रिल आणि मे महिन्यात कापसाला काय भाव मिळू शकतो याबाबत तज्ञ लोकांनी दिलेली माहिती थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
बाजार अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात कापसाला सात हजार पाचशे रुपये, एप्रिल महिन्यात कापसाला आठ हजार रुपये आणि मे महिन्यात कापसाला 8,300 रुपये प्रति क्विंटल असा सरासरी बाजार भाव मिळू शकतो.
कापसाचे भाव या भाव पातळीवर राहणार असा अंदाज बाजार अभ्यासकांनी वर्तवला आहे. सरकी (कापूस बियाणे) आणि कॉटन केकचे (DHEP) म्हणजे सरकी पेंडचे दर, इतर देशांकडून वाढती मागणी आणि फॅब्रिक आणि स्पिंडल्सची वाढती मागणी या साऱ्या घटकांमुळे कापसाचे भाव वाढतील असा अंदाज अभ्यासकांनी वर्तवला आहे.
तथापि, अनेक संभाव्य धोके देखील आहेत जे कापसाच्या किमतीं कमी करू शकतात, जसे की निवडणुका किंवा अनपेक्षित बाजार घटना इ. कारणांमुळे कापसाचे भाव कमी देखील होऊ शकतात.
यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी या घटकांचा विचार करणे महत्त्वाचे आहे. यामुळे कापसाचे टप्प्याटप्प्याने विक्री केल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी फायदा मिळण्याची शक्यता अधिक आहे.
कापसाच्या किमती वाढण्याचे कारण
सरकी आणि सरकी पेंडचे दर : सरकी प्रति क्विंटल 300-500 रुपयांनी वाढले आहेत, तर सरकी पेंड दर प्रति क्विंटल 300 रुपयांनी वाढले आहेत. या किंमती वाढल्याने कापसाच्या किमतीवर देखील परिणाम होतो आणि कापसाचे भाव वाढतात. यामुळे आगामी काळात कापसाचे भाव आणखी वाढू शकतात असा अंदाज आहे.
इतर देशांत वाढती मागणी : भारतीय कापसाची इतर देशांत मागणी वाढली असून त्यामुळे सुमारे 20 लाख गाठींची निर्यात होत आहे. ही आंतरराष्ट्रीय मागणी देशांतर्गत पुरवठ्यावर दबाव आणते, संभाव्यतः स्थानिक किमतींवर परिणाम करते. हे देखील कारण कापसाच्या किमती वाढवू शकते.
फॅब्रिक्स आणि स्पिंडलची वाढती मागणी : फॅब्रिक्स आणि स्पिंडलची मागणी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत आहे. या वाढलेल्या मागणीमुळे कापूस सारख्या कच्च्या मालाची गरज वाढते, जी मागणी-पुरवठ्याच्या गतिशीलतेमुळे किमतींवर परिणाम करू शकते.