Cotton Rate Hike News : यावर्षी कापूस उत्पादकांनी निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करत कापूस उत्पादीत केला. सुरुवातीला मान्सूनचा लांबलेलं आगमन, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेली अतिवृष्टी परत ऐन कापूस अंतिम टप्प्यात असताना कोसळलेला परतीचा पाऊस यामुळे कापूस उत्पादनात भली मोठी घट झाली.
अतिवृष्टीमुळे कापूस पिकावर गुलाबी बोंड आळी सारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला होता यामुळे फवारणी अधिक करावी लागली. साहजिकच उत्पादन खर्चात वाढ झाली. उत्पादनात घट, उत्पादन खर्चात वाढ याची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना विक्रमी दराची अपेक्षा आहे.
सध्या कापूस दर नरमलेले आहेत यामुळे बाजारात आवक कमी आहे. शेतकरी बांधव केवळ गरजेपुरता कापूस बाजारात आणत आहेत. खाजगी व्यापारी सध्या कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटल ते साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव देत आहेत.
पण बाजार समितीमध्ये कापसाला साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटलचा सरासरी दर मिळत आहे. मात्र सध्याच्या भावात कापूस विक्री करणे परवडत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे बाजारात नेहमीच्या तुलनेत कापूस आवक खूपच कमी आहे.
परिणामी जिनिंग प्रेसिंगचा उद्योग संकटात सापडला आहे. आवक कमी असल्याने उद्योगाची गोची होत असून लवकरच बाजारभावात सुधारणा होण्याची अशा व्यक्त केले जात आहे. काही जाणकार लोकांनी असा दावा केला आहे की संक्रांतीनंतर कापसाची मागणी वाढू शकते.
सध्या जागतिक बाजारात कापूस गाठीची मागणी मंदावली असल्याने कापसाला मागणी नसल्याचे चित्र आहे. तसेच इतर देशांच्या तुलनेत भारतीय कापूस महाग असल्याने त्याला निर्यातीला अडचण येत आहे. परंतु संक्रांत नंतर परिस्थितीत बदल होणार असून जागतिक बाजारात कापूस तर वाढणार आहेत यामुळे भारतीय कापूस देखील मोठ्या प्रमाणात निर्यात होणार आहे.
तसेच आता चीनमध्ये कोरोना निर्बंध शिथिल होत असल्याने त्या ठिकाणी कापसाची मागणी वाढणार आहे. निश्चितच भविष्यात दरवाढ होणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज कापूस उत्पादकांच्या चेहऱ्यावर समाधान आणत आहे.