Cotton Rate Hike : कापसाला पांढरे सोने म्हणून शेतकरी बांधव संबोधत असतात. हे पांढरे सोने मात्र शेतकऱ्यांसाठी चांगलेच निराशादायी सिद्ध होत आहे. वास्तविक, गेल्या आठवड्यात कापूस दरात वाढ झाली होती. कापसाची पंढरी म्हणून जगात ख्याती प्राप्त असलेल्या विदर्भात कापूस दरवाढ झाली होती. विदर्भातील अकोला जिल्ह्याच्या अकोट एपीएमसीमध्ये गेल्या आठवड्यात कापूस दर 8845 रुपये प्रतिक्विंटल पर्यंत पोहोचले होते.
मात्र आता या ठिकाणी भावात मोठी घसरण होत आहे. यामुळे कापूस उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. विशेष बाब अशी की, गेल्या आठवड्यात जाणकार लोकांनी कापूस दरात वाढ होईल आणि दर 9000 रुपये प्रति क्विंटलचा टप्पा गाठतील असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र त्यावेळी जाणकार लोकांनी कापसाच्या आवकेत वाढ झाली तर निश्चितच दरात घसरण होईल अस देखील स्पष्ट केलं होत. आता कापसाची आवक बाजारात वाढली असल्याने दरात तज्ञांच्या म्हणण्यानुसार घसरण होत आहे.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! ‘या’ 31 मार्गांवर सुरु होणार वंदे भारत एक्सप्रेस; मुंबई, पुणे शहरालाही मिळणार नवीन वंदे भारत ट्रेनची भेट
गेल्या तीन दिवसात विदर्भातील अकोट एपीएमसीमध्ये कापूस दरात घसरण झाली असून 260 रुपये प्रति क्विंटल एवढी घसरण दरात झाली आहे. सध्या बाजारात कापसाला 8000 ते 8580 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळत आहे. यामुळे गेल्या आठवड्यात दरवाढीचा अंदाज व्यक्त झाला तरीही दरात घसरण झाली असल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. जाणकारांनी मात्र कापूस आवक वाढली असल्याने भावात घसरण झाली असे नमूद केले आहे.
तसेच गेल्या आठवड्यात देखील तज्ञ लोकांच्या माध्यमातून कापूस आवक जशी वाढेल तसे भाव कमी होतील असा ईशारा देण्यात आला होता. दरम्यान सध्या शेतकऱ्यांना पैशांची निकड असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीसाठी येत आहे. आता शेतकऱ्यांकडे थोड्याफार प्रमाणात शिल्लक असलेला कापूस बाजारात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात दाखल होत असल्याने आगामी काळात दरवाढ होणार का हा मोठा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
दरम्यान जाणकार लोकांनी आवक कमी राहिली तर दर वाढतील नाहीतर दरात घसरण होईलच असे यावेळी देखील सांगितल आहे. यामुळे शेतकऱ्यांना बाजाराचा आढावा घेऊन कापसाची विक्री करावी लागणार आहे. एकंदरीत यंदा कापसाने शेतकऱ्यांना चांगलाच इंगा दाखवला आहे. आधीच कृषी निविष्ठांच्या किमती दिवसेंदिवस आकाशाला गवसणी घेत असल्याने कापूस उत्पादित करण्यासाठी अधिकचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
अशातच आता कापसाला अपेक्षित असा भाव देखील बाजारात मिळत नसल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्च भागवणे देखील मुश्किल झाले आहे. एकंदरीत सध्याची बाजारातील परिस्थिती पाहता आगामी काळात आवक वाढली तर दरात घसरण होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे दरवाढीची शक्यता उराशी बाळगून बसलेल्या बळीराजाला याचा मोठा फटका बसणार आहे.
हे पण वाचा :- काय सांगता! वंदे भारत एक्सप्रेसने आतापर्यंत केला ‘इतक्या’ लाख लोकांनी प्रवास; पंतप्रधान मोदींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती