Cotton Rate Hike : कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित होणार एक मुख्य नगदी पीक. याला पांढरे सोने म्हणून शेतकरी ओळखतात. खरं पाहता गत हंगामात कापसाला 12 ते 13 हजाराचा भाव मिळाला यामुळे पांढऱ्या सोन्याने शेतकऱ्यांना मालामाल बनवलं. परिणामी यंदा कापसाची लागवड वाढली. विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश मधील बहुतांशी जिल्ह्यात कापूस लागवड वाढली. अकोला जिल्ह्यातही कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात या हंगामात झाली.
शेतकऱ्यांना गेल्या हंगामाप्रमाणे याही हंगामात कापसाला विक्रमी दर मिळेल आणि चार पैसे पदरी अधिक शिल्लक राहतील अशी आशा होती. मात्र यंदा अगदी सुरुवातीपासूनच कापूस दर दबावत आहेत. त्यामुळे चांगल्या दराची शेतकऱ्यांची आशा धुळीस मिळाली आहे. दरम्यान कापूस पंढरी म्हणून विख्यात असलेल्या अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती मधून कापूस उत्पादकांसाठी एक गोड बातमी समोर येत आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी खुशखबर ! आता मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त, मुंबई मेट्रो जारी करणार पास, पहा कसा राहणार पासचा दर
अकोट एपीएमसी मध्ये गेल्या तीन दिवसांपासून कापूस दरात वाढ होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. काल झालेल्या लिलावात अकोट एपीएमसी मध्ये कापसाला 8350 रुपये प्रति क्विंटल इतका कमाल दर मिळाला. म्हणजेच बुधवारी झालेल्या लिलावापेक्षा पंधरा रुपये प्रति क्विंटल इतकी वाढ कालच्या लिलावात नमूद करण्यात आली.
दरम्यान मंगळवारी आणि बुधवारी देखील कापूस दरात वाढ झाली होती. कमाल दरात वाढ होत असल्याने याचा परिणाम म्हणून आगामी काही दिवसात कापूस दरात वाढ होऊ शकते अशी आशा पुन्हा एकदा शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी ही निश्चितच सुखद बातमी आहे.
हे पण वाचा :- पुणे, सोलापूर वासियांसाठी महत्त्वाची बातमी; पुणे-सिकंदराबाद वंदे भारत ट्रेन केव्हा सुरु होणार? पहा
परंतु शेतकऱ्यांना कापसाला किमान 9 ते 10 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा अशी आशा आहे. त्यामुळे सध्या स्थितीला मिळत असलेला दर शेतकऱ्यांसाठी विशेष फायदेशीर नसल्याचे सांगितले जात आहे. अकोट एपीएमसी मध्ये गेल्या तीन दिवसात 55 रुपयांची प्रतिक्विंटल मागे वाढ झाली आहे.
कापसाचे दर सध्या एपीएमसी मध्ये 7700 ते 8350 रुपये प्रतिक्विंटल दरम्यान आहेत. राज्यातील इतरही बाजारात याच भाव पातळी दरम्यान कापसाचे भाव कायम आहेत. शेतकऱ्यांना निश्चितच भविष्यात दरवाढीची आशा आहे. यामुळे आगामी काळात कापूस भावात वाढ होते का याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.
हे पण वाचा :- एसटी महामंडळात मेगा भरती ! फक्त 10वी पास उमेदवार करू शकतात अर्ज, वाचा सविस्तर