Cotton Rate Hike : कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. दिलासादायक बातमी अशी की कापसाचे वायदे 13 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. सेबीने कापूस वायद्यावरील बंदी हटवण्याचा निर्णय घेतला असल्याने आणि त्या अनुषंगाने एमसीएक्स यांनी एक पत्रक काढून 13 फेब्रुवारी रोजी पासून कापूस वायदे सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
कापूस वायदे हे एप्रिल ते जून पर्यंतचे राहणार असून यामुळे भविष्य काळातील कापसाचे भाव व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना समजण्यास मदत होणार आहे. यामुळे पुढील दोन ते तीन आठवड्यात कापूस दरात सुधारणा होणार असल्याचा अंदाज तज्ञांनी बांधला आहे. आता कापसाचे फायदे सुरू होणार आहेत.
तसेच चीन आणि पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात कापूस मागणी वाढणार आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय दरात तेजी आली असून भविष्यात ही तेजी कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. जाणकार लोकांच्या मते दोन ते तीन आठवड्यात कापसाला साडेनऊ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळू शकतो. म्हणजेच कापूस 8500 ते 9500 दरम्यान विक्री होऊ शकतो.
अशा परीस्थितीत शेतकरी बांधवांनी विक्रीचे नियोजन आखतांना मात्र काळजी घ्यावी लागणार आहे. कारण की आता दरात वाढ होईल आणि त्याच वेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव कापूस विक्री करण्यासाठी गर्दी करतील. खरं पाहता गेल्या काही दिवसांपासून कापसाला कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना कापूस पिकवण्यासाठी घेतलेली देणी फेडणे हेतू पैसे नाहीत.
म्हणून शेतकरी बांधव दरवाढ झाली की मोठ्या प्रमाणात कापूस विक्री करण्यासाठी पुढे सरसावणार आहेत. मात्र एकाच वेळी कापूस विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होणार असल्याने आवक वाढेल आणि याचा इनडायरेक्ट परिणाम दरावर होईल. यामुळे जाणकार लोकांनी शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री करण्याचा सल्ला दिला आहे.
बहुसंख्य शेतकऱ्यांनी एकाच वेळी कापूस विक्रीसाठी आणला तर दरात वाढ होण्याऐवजी दरात मोठी घट होऊ शकते असं देखील तज्ञ नमूद करत आहेत. एकंदरीत काय तर शेतकऱ्यांना आता विक्रीचे नियोजन टाकताना काळजी घ्यावी लागणार आहे.
शेतकऱ्यांनो सावधान ! कापसाची साठवणूक केलीय का? मग ‘हे’ एकदा वाचाच, कापूस साठवणूक केल्याने…..