Cotton Rate : कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. खरं पाहता कापूस वायदे पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. वायदे सुरू झाले म्हणजे दरात वाढ होण्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. याशिवाय तज्ञ लोकांनी दरवाढ का होऊ शकते याची काही आणखी कारणे सांगितले आहेत. तज्ञ लोकांच्या मते चीन आणि पाकिस्तानात कापसाची मागणी वाढणार आहे.
पाकिस्तान हा वास्तविक कापसाचा मोठा उत्पादक देश आहे. पण त्या ठिकाणी यंदा कापसाचे उत्पादन कमी झाल आहे. त्यामुळे त्या ठिकाणी यावर्षी थोडी अधिक मागणी राहणार असल्याचा अंदाज आहे. शिवाय चायना मध्ये कोरोना निर्बंध शिथिल होत असून आता त्या ठिकाणी बाजारपेठा गजबजू लागल्या आहेत. साहजिकच चायना हा कापसाचा मोठा आयतदार देश आहे.
यामुळे त्या ठिकाणी जर मागणी वाढली तर याचा सरळ परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात जाणवेल. किंबहुना याचा परिणाम जाणवायला सुरुवात झाली आहे. जागतिक बाजारात गेल्या 15 ते 20 दिवसांपासून तेजी असल्याचे मत तज्ञ व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे जो भारतीय कापूस जागतिक बाजाराच्या तुलनेत महाग होता तो आता स्वस्त झाला आहे. परिणामी भारतीय शेतकऱ्यांनी आता कापसाची विक्री खूपच कमी केली आहे. याचाच अर्थ आता बाजारात कापसाची आवक नगण्य आहे.
यामुळे मागणी आणि पुरवठा यामध्ये कुठे ना कुठे दरी तयार होणार आहे, तफावत निर्माण होणार आहे. यामुळे आगामी काही दिवसात कापूस दरात वाढ होऊ शकते असा अंदाज तज्ञांकडून बांधला जात आहे. साहजिकच तज्ञांनी बांधलेला हा अंदाज आहे हा अंदाज किती प्रमाणात सत्यात उतरतो हे निश्चितच स्पष्ट होईल. मात्र दरवाढीची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांना तूर्तास दिलासा मिळणार असून शेतकरी बांधवांनी भाव वाढीसाठी प्रतीक्षा केली पाहिजे असं तज्ञांकडून सांगितलं जात आहे.
तज्ञांच्या मते या हंगामात 8500 ते 9500 दरम्यान दर मिळू शकतो. म्हणजेच खूप काही मोठी दरात वाढ तज्ञांकडून वर्तवली जात नाहीय. मात्र सद्यस्थितीला कापूस दर साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली आले आहेत. यामुळे 8 हजार पाचशे ते नऊ हजार पाचशे हा दर सध्याच्या दराशी तुलना केला असता अधिक राहणार आहे.
यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांनी बाजाराचा आढावा घेऊन कापूस विक्री टप्प्याटप्प्याने केली तर त्यांचा या ठिकाणी फायदा होण्याची शक्यता अधिक आहे. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख बाजारात कापसाला काय भाव मिळाला आहे याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
सावनेर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 4100 क्विंटल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 7800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 7950 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 7900 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे.
मनवत कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 2400 क्विंटल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 7000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8125 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 8050 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे.
किनवट कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 69 क्विंटल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 7500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 7700 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 7600 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे.
राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 3600 क्विंटल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 7700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 7985 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 7950 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे.
भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 235 क्विंटल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 7650 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 7810 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 7730 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे.
अकोला- बोरगावमंजू कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 128 क्विंटल लोकल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 7900 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8338 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 8119 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे.
देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 1500 क्विंटल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 7000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 7800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 7500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे.
वरोरा- माढेली कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 378 क्विंटल लोकल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 7800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 7950 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 7850 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे.
उमरेड कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 848 क्विंटल लोकल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 7700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 7950 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 7850 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे.
वरोरा- खांबाडा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 470 क्विंटल लोकल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 7300 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 7900 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 7600 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे.
बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 22 क्विंटल मध्यम स्टेपल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 5500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 7726 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 7460 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे.
हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 6010 क्विंटल मध्यम स्टेपल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 7800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8080 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 7965 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे.