Cotton Rate : शेतकरी बांधवांना डिसेंबर 2022 पासून कापूस दरात घसरण होत असल्याने मोठा आर्थिक फटका बसत आहे. जानेवारी महिन्यात सुरुवातीला दरात थोडीशी सुधारणा झाली होती. कापूस दर 8,400 ते 9 हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यान नमूद केला जात होता.
मात्र आता यामध्ये घसरण झाली असून 8 हजार ते 8,500 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा कापूस दर नमूद केला जात आहे. काही ठिकाणी यापेक्षाही कमी दर मिळत आहे. आज खानदेशमधील यावल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला आठ हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी दर मिळाला आहे.
निश्चितच कापूस दरात झालेली घसरण कापूस उत्पादकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. मात्र अशातच कापूस उत्पादकांसाठी एक दिलासादायक बातमी देखील समोर येत आहे. खरं पाहता, आता पुढील आठवड्यापासून कापूस दरात सुधारणा होणार असल्याचा अंदाज बाजारअभ्यासकांनी वर्तवला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून कापूस दरात सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे.
मात्र दरात घसरण झाली अन लगेच शेतकऱ्यांनी कापूस विक्री थांबवली. यामुळे दरात होणारी पडझड आता सावरू लागली असून लवकरच दरात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून कापूस दरात मोठी सुधारणा होणार असल्याचा अंदाज जाणकारांनी वर्तवला आहे.
यावर्षी कापसाला चांगला दर मिळू शकतो परिणामी शेतकऱ्यांनी साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा कमी दरात कापूस विक्री कदापी करू नये असं देखील जाणकारांनी सांगितल आहे. येत्या मार्च महिन्यात कापसाला साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल ते नऊ हजार पाचशे रुपये पर्यंतचा दर मिळू शकतो.
अशा परिस्थितीत कापसाला 9 हजार रुपये प्रतिक्विंटल पेक्षा अधिक दर मिळू लागला मग शेतकऱ्यांनी विक्रीचे नियोजन आखावे असं जानकारांकडून सांगितले जात आहे.