Cotton Rate : कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस देखील निराशा जनक राहिला आहे. राज्यातील प्रमुख बाजारात कापसाला आठ हजार रुपये प्रतिक्विंटल पेक्षा कमी दर नमूद करण्यात आला. काही बाजारात निश्चितच कापसाला सरासरी 8000 रुपये ते 8200 दरम्यान दर मिळाले आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या मते निदान 10,000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला तर कापूस पीक फायदेशीर ठरणार आहे.
त्यामुळे सध्या मिळत असलेल्या दराबाबत शेतकरी निश्चितच समाधानी नसल्याचे चित्र आहे. दरम्यान जाणकार लोकांनी कापूस दरवाढीचा अंदाज बांधला आहे. तज्ञ लोकांच्या मते, चीन आणि पाकिस्तानकडून कापसाची मागणी वाढण्याची शक्यता लक्षात घेता आंतरराष्ट्रीय दरात गेल्या काही दिवसांपासून मोठी तेजी आहे.
निश्चितच याचा अजून तरी देशांतर्गत फायदा पाहायला मिळालेला नाही मात्र भविष्यात दरवाढ होण्याची शक्यता असल्याचे तज्ञांनी नमूद केले आहे. याशिवाय तज्ञ लोकांनी आता देशात वायदे सुरू झाले असल्याने याचा देखील सकारात्मक परिणाम बाजारावर जाणवणार असल्याचा अंदाज बांधला आहे. अर्थसंकल्प देखील आता नुकताच पार पडला आहे यामुळे आता आगामी काही दिवसांत दरवाढीचा अंदाज तज्ञांनी कायम ठेवला आहे.
तज्ञ लोकांच्या मते, या हंगामात कापसाला साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल ते 9500 प्रतिक्विंटल दरम्यान दर हा कापसाला मिळू शकतो. तर इकडे शेतकरी बांधव फेब्रुवारी महिन्यात दरवाढ झाली तर आमचा फायदा होईल नाहीतर मार्च एंडिंग असल्याकारणाने नाईलाजांसत्व कापूस कमी भावातच विक्री करावा लागेल असं मत नमूद करत आहेत. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख बाजारात कापसाला काय भाव मिळाला आहे याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा सविस्तर प्रयत्न करणार आहोत.
सावनेर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 4500 क्विंटल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 7800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8100 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 8000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे.
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 540 क्विंटल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 7800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 7900 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे.
सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 2130 क्विंटल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 7250 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8200 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 8140 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे.
भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 458 क्विंटल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 7600 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 7900 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 7750 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे.
पारशिवनी कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 980 क्विंटल एच-४- कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 7900 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 7950 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे.
अकोला- बोरगावमंजू कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 140 क्विंटल लोकल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 8088 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8357 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 8222 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे.
देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 1500 क्विंटल लोकल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 7200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 7935 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 7895 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे.
काटोल कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 85 क्विंटल लोकल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 7800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8050 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 7900 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे.
हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 7511 क्विंटल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 7800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8135 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 7960 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे.
शेतकऱ्यांनो सावधान ! कापसाची साठवणूक केलीय का? मग ‘हे’ एकदा वाचाच, कापूस साठवणूक केल्याने…..