Cotton Rate : कापूस हे राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील विभागात लावले जाणारे एक मुख्य पीक आहे. खरीप हंगामातील या पिकावर राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. दरम्यान राज्यातील मराठवाडा विभागातील कापूस उत्पादकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे मराठवाड्यातील परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सीसीआयची कापूस खरेदी सुरू होणार आहे. 2023 24 या हंगामासाठी भारतीय कापूस महामंडळ अर्थातच सीसीआयने कापूस खरेदी केंद्र या ठिकाणी प्रस्तावित केले आहे.
यामुळे परिसरातील कापूस उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांच्या घामाला योग्य भाव मिळणार अशी आशा व्यक्त होत आहे. बाजार समिती प्रशासनाने लवकरच हे केंद्र कार्यान्वित होणार असे यावेळी म्हटले आहे.
आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सीसीआयकडून कापूस खरेदी होत नाहीये. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
यामुळे परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने परिसरातील शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन सी सी आयकडे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला.
यासाठी गेल्या वर्षी जून महिन्यात संचालक मंडळाच्या मासिक सभेत याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. यानंतर सीसीआयच्या सरव्यवस्थापकासोबत याबाबत पत्रव्यवहार सुरू झाला.
अखेर कार बाजार समितीच्या या पाठपुराव्याला आता यश आले आहे. कारण की या ठिकाणी या चालू हंगामासाठी कापूस खरेदी केंद्र सुरू होणार आहे.
यामुळे शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव मिळू शकणार आहे. या खरेदी केंद्राचा शेतकऱ्यांना मोठा आधार मिळेल अशी आशा आहे.
खरंतर परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ आणि येथील स्थानिक लोकप्रतिनिधी या मागणीसाठी सीसीआयकडे गेल्या काही महिन्यांपासून पाठपुरावा करत होते.
काही लोकप्रतिनिधींनी विधानसभेत देखील याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. याच सर्व गोष्टींची सीसीआयने दखल घेतली आहे. आता इथे लवकरच सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू होणार आहे.