Cotton Rate News : कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित होणार एक मुख्य पीक आहे. खरीप हंगामात उत्पादित केल्या जाणाऱ्या या पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश या तीन विभागात प्रामुख्याने कापूस लागवड पाहायला मिळते. विशेष म्हणजे अलीकडील काही काळात कापसाला चांगला दर मिळत असल्याने कापूस लागवडीचे क्षेत्र राज्यात वाढले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातही आता कापसाचे उत्पादन घेतले जात आहे. कापसाचे क्षेत्र वाढत आहे मात्र सध्या मिळत असलेला दर हा कापूस उत्पादकांना परवडणारा नसल्याचे सांगितले जात आहे. खरं पाहता गत हंगामात कापसाला 12 ते 13 हजाराचा दर मिळाला. अशा परिस्थितीत याही हंगामात कापसाला अधिक दर मिळेल अशी भोळी-भाबडी आशा बळीराजाने उराशी बाळगली होती.
विशेष बाब अशी की सुरुवातीच्या टप्प्यात अगदी महूर्ताच्या कापसाला तब्बल 14 हजारापर्यंतचा दर कापूस नगरी जळगाव मध्ये मिळाला. मात्र मुहूर्ताच्या कापसाला झालेली ही दरवाढ शेतकऱ्यांसाठी फायद्याची कमी आणि तोट्याची अधिक राहीली. मुहूर्ताच्या कापसाला भाव मिळाला म्हणजे अगदी बोटावर मोजण्या इतक्या शेतकऱ्यांना हा भाव देण्यात आला. यामुळे मात्र कापूस वेचणी करणाऱ्या मजुरांकडून वेचनीसाठी अधिकची मजुरी घेतली जाऊ लागली.
अशा परिस्थितीत कापूस पिकासाठी उत्पादन खर्च अधिक झाला. दरम्यान, मुहूर्ताचा कालावधी वगळला तर कापूस दर दबावातच आहेत. नोव्हेंबर पर्यंत कापसाला 9000 पर्यंतचा दर मिळत होता. मात्र डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कापसाला फक्त साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळाला. दरात तब्बल दीड हजारापर्यंतची घसरण झाली. जानेवारी महिन्यात थोडीशी वाढ झाली आणि अकोट सारख्या मुख्य बाजारात कापसाने पुन्हा एकदा 9000 चा टप्पा गाठला.
मात्र दरात झालेली ही वाढ देखील अधिक काळ टिकली नाही. सध्या स्थितीला कापूस 8000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी दरात राज्यातील बाजारात विक्री होत आहे. मात्र जाणकार लोकांनी कापूस दरात वाढ होण्यासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज बांधला आहे. जाणकार लोकांच्या मते, चायना आणि पाकिस्तान मधून कापूस मागणी वाढणार आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात ऑलरेडी तेजी आली आहे.
तसेच 13 फेब्रुवारी पासून कापसाचे वायदे पुन्हा एकदा देशात सुरू होणार आहेत. याचा देखील कापूस बाजारावर सकारात्मक परिणाम होणार आहे. यामुळे कापूस दरात वाढ होण्याची परिस्थिती तयार होत आहे. निश्चितच तज्ञ लोकांनी कापूस दर वाढीसाठी पोषक परिस्थिती असल्याचा दावा केला असला तरी देखील सद्य परिस्थिती शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय आहे. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख बाजारात कापसाला काय भाव मिळाला आहे याविषयी जाणून घेणार आहोत.
मनवत कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 1700 क्विंटल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 7000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8055 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 7960 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
वरोरा- माढेली कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 450 क्विंटल लोकल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 7600 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 7900 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 7800 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
उमरेड कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 815 क्विंटल लोकल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 7620 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 7840 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 7750 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 892 क्विंटल लोकल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 6000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 7900 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 7400 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
आखाडाबाळापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 93 क्विंटल लोकल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 7500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 8000 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
वरोरा- खांबाडा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 497 क्विंटल लोकल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 7600 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 7900 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 7800 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 1300 क्विंटल मध्यम स्टेपल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 7850 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8025 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 7950 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.