Cotton Rate : कापूस हे महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. या पिकाची संपूर्ण राज्यभर लागवड केली जाते. राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश या विभागातील बहुतांशी शेतकऱ्यांचे या पिकावर अर्थकारण अवलंबून आहे.
दरम्यान राज्यातील कापूस उत्पादकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी गुड न्यूज समोर आली आहे. ती म्हणजे कापुस बाजार भावात पुन्हा एकदा मोठी वाढ नमूद करण्यात आली आहे.
यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. खरे तर गेल्या दीड ते दोन वर्षांपासून कापसाचे भाव दबावत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या हजारो रुपयांचे नुकसान होत आहे.
पिकासाठी आलेला खर्च देखील शेतकऱ्यांना भरून काढता येत नसल्याचे विदारक दृश्य पाहायला मिळाले आहे. यामुळे बाजारभावात सुधारणा झाली पाहिजे अशी शेतकऱ्यांची इच्छा होती.
दरम्यान राज्यातील परभणी जिल्ह्यातील काही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाचे भाव 1000 रुपये प्रति क्विंटल ते 1200 रुपये प्रति क्विंटल पर्यंत वाढले आहेत. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे.
कुठे मिळाला विक्रमी भाव
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील परभणी जिल्ह्यातील सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल अर्थातच 28 फेब्रुवारी 2024 ला झालेल्या लिलावात कापसाला सहा हजार पाचशे ते आठ हजार 80 रुपये प्रति क्विंटाला असा भाव मिळाला आहे.
या मार्केटमध्ये कापसाला 7290 रुपये प्रतिक्विंटल असा सरासरी दर नमूद करण्यात आला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या मार्केटमध्ये काल पावसात भिजलेल्या कापसाला प्रतिक्विंटल किमान ६५०० ते कमाल ७७०० रुपये प्रतिक्विंटल असा बाजार भाव मिळाला आहे.
तसेच न भिजलेल्या कापसाला प्रतिक्विंटल किमान ७९०० ते कमाल ८०८० रुपये तर सरासरी ८०४० रुपये दर मिळाले असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांशी तुलना केली असता कालचे बाजार भाव समाधानकारक होते. या बाजारात कापसाच्या बाजारभावात काल 1000 ते 1200 रुपये प्रति क्विंटल अशी वाढ नमूद करण्यात आली आहे.
यामुळे आता शेतकऱ्यांना आगामी काळात बाजारभावात आणखी वाढ होऊ शकते अशी आशा वाटू लागली आहे.