Cotton Price : संपूर्ण भारत वर्षात कापूस पिकाची खरीप हंगामात (Kharif Season) मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. आपल्या महाराष्ट्रात देखील कापूस लागवड विशेष उल्लेखनीय आहे. महाराष्ट्रातील खानदेश विभाग कापसाच्या उत्पादनासाठी (Cotton Production) संपूर्ण भारत वर्षात ओळखला जातो.
याशिवाय महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात कापसाची शेती (Cotton Farming) पाहायला मिळते. एकंदरीत राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे सर्व अर्थकारण कापूस (Cotton Crop) या खरीप हंगामातील मुख्य पिकावर अवलंबून असल्याचे चित्र आहे.
अशा परिस्थितीत कापसाला काय बाजार भाव (Cotton Market Price) मिळेल याकडे कापूस उत्पादक शेतकरी बांधवांचे (Cotton Grower Farmer) लक्ष लागून असते. आता कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आगामी काही दिवसात कापसाला चांगला बाजार भाव (Cotton Rate) मिळणार असल्याचे जाणकारांनी नमूद केले आहे.
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही महिन्यांपासून जागतिक पातळीवर कापड बाजार आणि उद्योग अडचणीत होते. प्रामुख्याने महागाईमुळे या उद्योगावर मंदीचे सावट होते. दरम्यान आता भारतात काहीशी परिस्थिती सुधारत असल्याचे चित्र आहे. भारतात येत्या काही दिवसात दिवाळी तसेच ईद सण येतोय अशा परिस्थितीत कपड्यांची मागणी वाढतेय.
जागतिक पातळीवर विचार केला तर पुढील महिन्यापासून जागतिक कापड बाजार पूर्वपदावर येऊ शकणार आहे. याचा फायदा भारतीय कापसाला होणार असल्याचे सांगितले जात आहे. पुढील महिन्यापासून जागतिक कापड बाजार पूर्वपदावर येणार आहे आणि याच वेळी देशांतर्गत कापसाची आवक वाढणार असल्याने कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना याचा फायदा होणार आहे.
या वर्षी प्रमुख कापूस उत्पादक देश चीन अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये हवामान बदलामुळे कापसाच्या उत्पादनात भली मोठी घट झाली आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसात भारतीय कापसाला मागणी वाढणार असून कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना सोन्याचे दिवस येणार असल्याचे सांगितले जात आहे. कापडं उद्योग या वर्षी देशात कापसाचे उत्पादन वाढणार असल्याचे सांगत आहेत मात्र जाणकार लोकांनी उद्योग जगताचा दावा खोडून काढला आहे.
जाणकार लोकांच्या मते यावर्षी कापसाचे 330 गाठीपर्यंत उत्पादन होणार आहे. सध्या देशाअंतर्गत जो कापूस बाजारात येतो येतो कापूस ओला आहे. अशा परिस्थितीत ओल्या कापसाला कमी बाजार भाव मिळतो. सध्या ओल्या कापसाला सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव (Cotton Bazar Bhav) मिळत आहे. मात्र आगामी काळात कापसाचा दर्जा सुधारणार असल्याने बाजारभावात वाढ होणार आहे.
ओलावा कमी झाल्यानंतर या वर्षी कापसाला साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळणार असल्याचे जाणकार लोकांनी स्पष्ट केलेले आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसात कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना सुगीचे दिवस येणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनी विक्रीचे नियोजन आखतांना बाजारपेठेतील दराचा अंदाज बांधून टप्प्याटप्प्याने विक्री करावी. असा सल्ला यावेळी जाणकार लोकांकडून शेतकरी बांधवांना देण्यात आली आहे.