Cotton Price : राज्यात 23 मे 2023 पासून ते 27 मे 2023 पर्यंत कापसांचे किमान बाजार भाव साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी झाले होते तसेच कमाल बाजार भाव सात हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा कमी झाले होते.
यामुळे हंगामाच्या सरतेशेवटी कापूस उत्पादकांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. यामुळे कापूस उत्पादकांना उत्पादन खर्च देखील भरून निघणार नाही असं चित्र तयार होत होतं. मात्र आता हंगामाच्या अंतिम टप्प्यात दरात सुधारणा झाली आहे.
राज्यातील बहुतांशी बाजारात जून महिन्याच्या सुरुवातीपासून दरात मोठी तेजी पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील प्रमुख बाजारात कापसाच्या दरात 500 ते 700 रुपये प्रतिक्विंटल पर्यंतची सुधारणा पाहायला मिळाली आहे.
हे पण वाचा :- पीएम किसान योजना : ‘हे’ 18% शेतकरी राहणार योजनेपासून वंचित, पहा….
यामुळे साडेपाच हजार रुपये ते 7000 रुपये प्रति क्विंटल दरात विक्री होणारा कापूस आता 7575 रुपये प्रति क्विंटल पर्यंतच्या कमाल बाजारभावात विक्री होत आहे. विशेष म्हणजे सरासरी बाजार भाव देखील 7400 प्रतिक्विंटलपर्यंत पोहचले आहेत.
निश्चितच हंगामाच्या शेवटी कापूस उत्पादकांना यामुळे दिलासा मिळणार आहे. परंतु या दरातही कापूस विक्री परवडत नसल्याचे शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा नमूद केले आहे.
किमान 9000 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळाला असता तर कापसातून बऱ्यापैकी उत्पन्न मिळाले असते असे शेतकरी आजही सांगताहेत. एकंदरीत आता दुसऱ्या हंगामातील कापूस पेरणी सुरू झाली आहे तरीही कापसाच्या दरात अपेक्षित अशी वाढ झालेली नसल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे.
हे पण वाचा :- Tur Farming : यंदाही तुरीला मिळणार 10 हजाराचा दर ! पण तूर लागवड करतांना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या; नाहीतर….
या बाजारात मिळाला विक्रमी दर !
परभणी जिल्ह्यातील मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती, सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती आणि परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती या तीन बाजारात कापसाच्या बाजारभावात गेल्या काही दिवसांपासून 500 ते 700 रुपये प्रतिक्विंटल पर्यंतची वाढ नमूद करण्यात आली आहे.
परिणामी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर थोडेसे समाधानाचे भाव पाहायला मिळत आहेत. शनिवारी अर्थातच 3 मे 2023 रोजी झालेल्या लिलावात मानवत एपीएमसी मध्ये कापूस 7400 प्रतिक्विंटल एवढ्या सरासरी दरात विक्री झाला. सेलू एपीएमसी मध्ये 7370 रुपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी बाजार भाव कापसाला मिळाला.
परभणीमध्ये देखील सात हजार चारशे रुपये प्रतिक्विंटलच्या आसपासच सरासरी बाजार भाव त्या दिवशी नमूद करण्यात आला. अर्थातच गेल्या महिन्यातील कापसाच्या बाजारभावाशी तुलना केली असता बाजारभाव 500 ते 700 रुपये प्रतिक्विंटल पर्यंत वाढले आहेत. यामुळे निश्चितच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हंगामाच्या सरते शेवटी का होईना ही दिलासादायक बाब ठरली आहे.
हे पण वाचा :- सोयाबीन वाण निवडताना ‘ही’ काळजी घ्या; उत्पादनातं विक्रमी वाढ होणार, वाचा….