Cotton Price Maharashtra : कापसाच्या दरात केल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. दरम्यान आज बाजारभावात वाढ झाली आहे, यामुळे कापूस उत्पादकांच्या चेहऱ्यावर कमालीचे समाधान पाहायला मिळत आहे. आज कापसाच्या कमाल बाजार भावाने 9,360 रुपयाचा पल्ला गाठला आहे.
आज महाराष्ट्रातील मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला 9360 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला असून 9275 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी बाजार भाव मिळाला आहे तसेच किमान बाजार भाव देखील 9 हजार रुपये प्रति क्विंटल नमूद झाला आहे.
यामुळे बळीराजाला कापूस लवकरच दहा हजार पार होईल अशी आशा पुन्हा एकदा वाटू लागली आहे. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापूस लिलावाची माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत.
सावनेर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज कापसाची 2200 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला 8700 प्रतिक्विंटल एवढा किमान, कमाल आणि सरासरी दर मिळाला आहे.
किनवट कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज कापसाला साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान, 9000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल तसेच सरासरी दर 8750 मिळाला आहे.
आष्टी वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये आज कापसाची 338 क्विंटल आवक नमूद झाली आहे. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला 8600 रुपये प्रति क्विंटल किमान, 8900 रुपये कमाल तसेच 8700 रुपये सरासरी दर मिळाला.
आर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती :- आरवी एपीएमसी मध्ये आज 363 क्विंटल कापूस आवक झाली. आज या एपीएमसी मध्ये कापसाला किमान आठ हजार सहाशे रुपये, कमाल 8900 रुपये तसेच सरासरी 8700 दर मिळाला.
उमरेड कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये आज कापसाची 138 क्विंटल आवक झाली असून कापसाला 8800 प्रतिक्विंटल किमान, 9000 रुपये प्रति क्विंटल कमाल तसेच सरासरी दर 8900 मिळाला आहे.
मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये कापसाला सर्वाधिक दर मिळाला आहे. या बाजारपेठेत आज कापसाला 9000 रुपये प्रति क्विंटल किमान, 9360 रुपये कमाल आणि 9275 रुपये सरासरी दर मिळाला आहे. आज मानवत मध्ये 800 क्विंटल लोकल कापसाची आवक झाली होती.
हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती :- या बाजारपेठेत आज 480 क्विंटल मध्यम स्टेपल कापसाचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कापसाला 8600 प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8990 रुपये प्रति करून एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 8760 रुपये नमूद झाला आहे.