Cotton Price Maharashtra : कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आज थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. कापसाच्या लिलावासाठी विशेष ओळखल्या जाणाऱ्या मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कापूस दरात थोडीशी सुधारणा झाली आहे.
आज मानवत एपीएमसी मध्ये कापसाला 9245 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला असल्याने शेतकऱ्यांच्या दरवाढीच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. खरं पाहता गेल्या आठवड्यात कापसाचे बाजार भाव 9000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा खाली आले होते.
मात्र आता मानवत एपीएमसीमध्ये कापूस साडेनऊ हजार रुपये प्रतिक्विंटलकडे वाटचाल करत असल्याने बळीराजाला थोडासा दिलासा मिळाला आहे. पण राज्यातील इतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अजूनही बाजार भाव 9 हजार रुपये प्रतिक्विंटल सरासरी भावापेक्षा खालीच आहेत. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कापूस लिलावाची माहिती जाणून घेणार आहोत.
राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 1500 क्विंटल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला 8700 प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8970 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 8900 नमूद झाला आहे.
आर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 821 क्विंटल एच-4 मध्यम स्टेपल कापसाची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला 8800 रुपये प्रतेक गुंतला एवढा किमान दर मिळाला असून 9050 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार व 8900 नमूद झाला आहे.
मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये आज 900 क्विंटल लोकल कापूस आवक झाली. आज झालेल्या लीलाबाद एपीएमसी मध्ये कापसाला नऊ हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 9245 रुपये प्रतिकूल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 9160 नमूद झाला आहे.
देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 300 क्विंटल लोकल कापूस आवक झाले. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला 8850 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 9170 प्रतेक गुंतला एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 8900 नमूद झाला आहे.