Cotton Price : कापूस दरातील चढ-उतार कायम आहे. यामुळे कापसाच्या बाजार भावाबाबत शेतकरी बांधव संभ्रमावस्थेत पाहायला मिळत आहेत. गेल्या चार ते पाच दिवसापूर्वी नऊ हजार रुपये प्रति क्विंटल एवढ्या सरासरी दराने कापूस विक्री होत होता.
मात्र आता, कापूस दरात घसरण झाली असून आज कापसाला 8 हजार 30 ते 8,830 पर्यंतचा सरासरी बाजार भाव मिळाला आहे. दरम्यान कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी कापूस दरात वाढ होणार असल्याची भविष्यवाणी केली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की जाणकार लोकांनी ऑक्टोबर महिन्यात दिवाळीनंतर कापूस दरात वाढ होणार असल्याची भविष्यवाणी केली होती. जाणकार लोकांचा हा अंदाज खरा देखील ठरला होता. दिवाळीनंतर कापूस दरात वाढ झाली होती. मात्र आता गेल्या पाच दिवसांपासून कापूस दरात घसरण होत आहे.
दरम्यान जाणकार लोकांनी पुढील एक महिना कापूस दरात चढ-उतार कायम राहणार असल्याचे सांगितले आहे. मात्र जानेवारी महिन्यात कापूस दरात पुन्हा एकदा वाढ होऊ शकते आणि कापसाला 9000 रुपये प्रति क्विंटलचा सरासरी दर मिळू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे निश्चितच कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना थोडासा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान शेतकरी बांधवांनी 90 हजार रुपये प्रति भाव पातळी लक्षात घेऊन कापसाची विक्री करत राहणे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे. जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे, चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढत असल्याने चीनमधील संपूर्ण मार्केट खुले झालेले नाही. अशा परिस्थितीत चीन मधून कापसाची मागणी कमी झाली आहे.
यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या बाजारभावात चढ-उतार निर्माण होत आहे. याचा परिणाम देशांतर्गत कापूस दरावर पाहायला मिळत आहे. एकंदरीत चीनमधून कापसाची लगेचच मागणी वाढण्याची शक्यता धुसर झाली असून जानेवारी महिन्यापर्यंत कापूस दरात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.
निश्चितच कापूस दर सध्या दबावात आहेत मात्र दरवाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा आढावा घेत कापसाची विक्री करणे त्यांच्यासाठी फायद्याचे राहणार आहे.