Cotton Price : कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. खरं पाहता गेल्या 2-3 दिवसांपासून कापूस दर तेजीत आले होते.
शिवाय चीनमध्ये लावण्यात आलेल्या लॉकडाऊन विरोधात तेथे सर्वसामान्य जनता सरकार विरोधात मोर्चा बांधणी करत असल्याने आणि तेथील मार्केट लवकरच पूर्ववत होणार असल्याने कापूस दरात अजूनच वाढ होण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवण्यात आली होती.
खरं पाहता चायना हा कापसाचा सर्वात मोठा ग्राहक असून तेथे मागणी वाढली म्हणजे जागतिक बाजारपेठेत कापसाचे दर वाढतात. मात्र आज अंतर्गत कापूस बाजारात याउलट प्रकार घडला आहे. आज कापूस दरात मोठी घसरण झाली आहे.
आज झालेल्या लिलावात राज्यातील सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला 8550 रुपये प्रति क्विंटल ते 8850 रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा दर मिळाला आहे.
यामुळे साहजिकच शेतकरी बांधवांची दरवाढीची आशा पुन्हा एकदा फोल ठरली आहे. यामुळे आज आपण राज्यातील प्रमुख एपीएमसीमध्ये झालेल्या कापसाच्या सौद्याची माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत.
सावनेर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 2550 क्विंटल कापसाची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला 8650 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8750 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 8700 नमूद झाला आहे.
राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या बाजारात आज कापसाचे चौदाशे क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला 8650 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8920 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 8850 नमूद झाला आहे.
उमरेड कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 107 क्विंटल लोकल कापसाचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला ८६०० रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8710 प्रतेक गुंतले एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 8650 नमूद झाला आहे.
देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- या बाजारात आज 300 क्विंटल लोकल कापसाची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला 8800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8965 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे तसेच सरासरी बाजार भाव 8850 नमूद झाला आहे.
बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती :- या बाजारात आज मध्यम स्टेपल कापसाचे 36 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8590 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 8550 नमूद झाला आहे.