Cotton News : राज्यात सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाची मोठ्या प्रमाणात शेती होते. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र तसेच खानदेशातील जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. एकंदरीत संपूर्ण राज्यात या दोन्ही पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होते.
या दोन्ही पिकांवर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. यंदा मात्र पांढरे सोने म्हणून ओळखला जाणारा कापूस शेतकऱ्यांसाठी क्लेशदायक सिद्ध झाला आहे. या चालू हंगामात कापसाला खूपच कमी भाव मिळाला असल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.
आता जवळपास हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. तरीही कापसाला अपेक्षित असा दर मिळत नाहीये. यामुळे या हंगामात कापूस पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता आला नाही असं शेतकऱ्यांचे मत आहे.
हे पण वाचा :- पांढरं सोन शेतकऱ्यांना बनवणार मालामाल ; कापसाच्या ‘या’ वाणातून मिळणार अधिकचे उत्पादन, वाचा….
अशातच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी परभणी जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. वास्तविक परभणी जिल्ह्यात कापसाची मोठ्या प्रमाणात शेती होते. जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचा मदार याच पिकावर आहे. गेल्या काही वर्षात कापसाला चांगला दर मिळत असल्याने जिल्ह्यात या पिकाच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे.
मात्र, या हंगामात कापसाला सुरुवातीचा काही काळ वगळला तर खूपच कवडीमोल दर मिळाला आहे. अशा परिस्थितीत दरवाढीच्या आशेने अजूनही जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे. यामुळे परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीने एक मोठा निर्णय घेतला आहे. खरंतर, बाजार समितीने 21 जून पासून टीएमसी कॉटन मार्केट यार्डवर होणारी कापूस खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात अजूनही अनेक कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे कापूस पडून आहे. परिणामी आता टीएमसी कॉटन मार्केट यार्डावर खाजगी व्यापाऱ्यामार्फत जाहीर लिलावाद्वारे होणारी कापूस खरेदीला मुदत वाढ देण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता शुक्रवार म्हणजे 30 जून 2023 पर्यंत कापसाची खरेदी सुरू राहणार आहे.
यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. निश्चितच बाजार समितीचा हा निर्णय परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यक्षेत्रातील कापूस उत्पादकांसाठी दिलासा देणारा सिद्ध होणार आहे.
हे पण वाचा :- देव पावला ! 23 ते 29 जून दरम्यान ‘या’ सात जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस, तुमच्या जिल्ह्यात कसं राहणार हवामान? वाचा….