Cotton News : सध्या कापूस उत्पादक शेतकरी बांधव मोठ्या संकटात असल्याचे चित्र आहे. एकीकडे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामात मोठा फटका बसला आहे तर दुसरीकडे बाजारात शेतमालाला अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने शेतकरी बांधव दुहेरी संकटात सापडला आहे.
कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना यंदा चांगला दर मिळेल अशी आशा होती. मात्र शेतकऱ्यांची ही आशा आता धुळीस मिळत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून दरात सातत्याने घसरण होत आहे. जवळपास पाचशे रुपयाची घसरण गेल्या पंधरा दिवसात नमूद झाली आहे. अशा परिस्थितीत, दरवाढीची आशा बाळगून असलेल्या शेतकऱ्यांना कापूस विक्री करावा की साठवणूक करावी हाच मोठा प्रश्न भेडसाव लागला आहे.
हे पण वाचा :- पुणेकरांसाठी दिलासादायक ! शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो मार्ग प्रकल्पाला मिळाली गती; 400 खांब तयार, केव्हा होणार पूर्ण काम?
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सरकीच्या दरात आणि रुईच्या दरात झालेली घसरण कापूस दरात घसरणेसाठी कारणीभूत आहे. खुल्या बाजारात रुईला तीन हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. हेच कारण आहे की, कापसाला खूपच कमी दर मिळत असल्याचे चित्र आहे.
एका आठवड्यापूर्वी कापूस दर 8100 ते 8200 रुपये प्रति क्विंटल पर्यंतच्या दरात विक्री होत होते. परंतु आता कापूस दर 7600 रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली आले आहेत. शेतकऱ्यांना मात्र दरात सुधारणा होण्याची आशा आहे. खरं पाहता गत हंगामा 14,000 चा दर कापसाला मिळाला.
परिणामी याही हंगामात विक्रमी भावाची आशा शेतकऱ्यांना होती. यातच सोशल मीडियावर काही अफवांमुळे शेतकऱ्यांची दिशा भूल करण्याचे काम झाले. सोशल मीडियामध्ये प्रामुख्याने व्हाट्सअप मध्ये अशा काही फेक पावत्या प्रसारित झाल्या ज्यामध्ये गेल्या हंगामातील दर दाखवण्यात आले. कुठे दहा हजार रुपये प्रति क्विंटल, कुठे 11000 रुपये प्रति क्विंटल अशा खोट्या पावत्या सोशल मीडियामध्ये वेगाने व्हायरल झाल्या. त्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांना गेल्यावर्षीप्रमाणेच याही वर्षी चांगला दर मिळेल असं वाटू लागलं.
यामुळे त्यांनी आठ हजार रुपये प्रति क्विंटल ते 9000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत कापूस दर असतानाही कापसाची विक्री करणे ऐवजी साठवणुकीवर भर दिला. यामुळे मात्र शेतकऱ्यांचे आता नुकसान झाले आहे. दरम्यान आता एप्रिल महिन्यात भाव वाढ होते की नाही यावरच कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे या हंगामातील भवितव्य अवलंबून राहणार आहे.
सध्या बाजारात कापसाचे आवक वाढली असल्याने कापूस दर दबावात असल्याचे एकंदरीत परिस्थिती पाहायला मिळत आहे. यामुळे जर एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून कापसाची आवक कमी झाली, आवकेचा दबाव कमी झाला तर कदाचित दरवाढ होऊ शकते असं काही तज्ञ नमूद करत आहेत. यामुळे आता एप्रिल महिन्यात भाववाढ होते का? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.
हे पण वाचा :- मुंबईवासियांसाठी महत्वाची बातमी! कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ‘या’ महिन्यात होणार सुरु; ‘या’ रेल्वे स्थानकावर थांबणार, पहा…..