Cotton News : कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी हंगामाच्या अंतिम टप्प्यात थोडीशी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. खरं पाहतात गेल्या चार दिवसांपासून कापूस दरात वाढ होत आहे. दरवाढीचा हा ट्रेंड पाहता शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यात होणारी दरवाढ शेतकऱ्यांना दिलासा देणारी असली तरी देखील शेतकऱ्यांची कापूस दर दहा हजार होण्याची इच्छा अद्याप पूर्ण झालेली नसल्याचे चित्र बाजारात आहे.
यामुळे शेतकरी बांधव कापूस दर दहा हजाराचा टप्पा पार करणार का? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित करत आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत दरात जवळपास 415 रुपयांची वाढ झाली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका शेतकऱ्याच्या कापसाला 8840 रुपये प्रति क्विंटलचा भाव आज मिळाला आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ ठिकाणी विकसित होणार नवीन केबल स्टेड ब्रिज, वाचा याविषयी सविस्तर माहिती
निश्चितच हा एक बाजार समितीमधील कमाल भाव असून सरासरी भाव याहीपेक्षा कमी होते. मात्र कमाल दरात वाढ होत असल्याने सरासरी बाजार भाव देखील वधारतील आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असा आशावाद या निमित्ताने व्यक्त होत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार 29 मार्च रोजी अकोट एपीएमसी मध्ये कापसाला 7800 ते 8425 रुपये प्रतिक्विंटल दरम्यान भाव मिळाला होता.
आज आठ एप्रिल 2023 रोजी कापसाला 8000 ते आठ हजार 840 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव मिळाला आहे. अशातच जाणकार लोकांनी कापूस दर वाढीचा ट्रेंड आगामी काही दिवस कायम राहील असा अंदाज बांधला आहे.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! आज 2 नवीन वंदे भारत एक्सप्रेस लाँच होणार; कोणत्या रूटवर धावणार, कसं असणार वेळापत्रक? पहा….
सध्याची बाजारातील परिस्थिती पाहता कापसाला नऊ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळू शकतो असा अंदाज जाणकार लोकांनी व्यक्त केला आहे. म्हणजेच कापूस दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचणार नसल्याचे जाणकारांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र असे असले तरी आगामी काही दिवसात आणखी दरात वाढ होईल आणि कापूस दर 9000 च्या घरात जातील असा अंदाज आहे.
पण येत्या काही दिवसात कापसाची आवक वाढली तर दर कमी देखील होऊ शकतात. यामुळे दरवाढ होईल की दरात घसरण होईल हे सर्वस्वी कापसाच्या आवकेवर आधारित राहणार आहे. एकंदरीत शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा आढावा घेऊन आपल्या विक्रीचे व्यवस्थापन या ठिकाणी करणे आवश्यक आहे.
हे पण वाचा :- मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजी नगर मध्ये घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर ! म्हाडा बांधणार ‘इतके’ घरे