Cotton News : कापूस हे आपल्या राज्यात उत्पादित होणार एक मुख्य नगदी पीक आहे. कापूस लागवडीखालील क्षेत्र गेल्या वर्षी पर्यंत कमी होत होतं मात्र गेल्यावर्षी कधी नव्हे तो विक्रमीदर कापसाला मिळाला आणि यंदा कधी नवे ते विक्रमी कापसाचीं लागवड करण्यात आली. कापसाची लागवड थोडीशी वाढली असली तरी देखील उत्पादनात घट झालीच आहे. खरं पाहता यंदा खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले.
अतिवृष्टी अन ढगाळ हवामान यामुळे गुलाबी बोंड अळी कपाशीवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली आणि यामुळे उत्पादनात भली मोठी घट होणार असल्याचा अंदाज जाणकारांचा आहे. एकीकडे कापसाचे उत्पादन कमी असल्याचे सांगितले जात आहे, तसेच बाजारात कापसाची आवक देखील कमी आहे मात्र असे असतानाही कापसाचे दर अजूनही दबावातच आहे.
दरम्यान आता शेतकरी बांधवांनी साठवणूक केलेला कापूस देखील विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात येऊ लागला आहे. यामुळे आवक वाढवून दर अजूनच दबावात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून शेतकरी बांधवांनी कापूस विक्री करताना घाई करू नये असा कृषी तज्ञांकडून दिला जात आहे. नवीन वर्षात दरात निश्चितच वाढ होणार असल्याचे काही तज्ञ नमूद करत असून शेतकऱ्यांना पॅनिक सेल करू नये असे आवाहन करत आहेत.
कापूस पणन महासंघ महाराष्ट्राचे माजी सर व्यवस्थापक गोविंद वैराळे यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार, केवळ भारतात कापसाचे उत्पादन कमी झाले असे नाही तर प्रमुख कापूस उत्पादक राष्ट्रातही कापसाचे उत्पादन कमी आहे. कमी उत्पादनामुळे दर निश्चितच वाढणार आहेत. यामुळे शेतकऱ्यानी कापूस विक्रीसाठी घाई करू नये.
कॉटन ॲडव्हाइजरी बोर्डचे माजी सदस्य विजय निवल यांनी देखील लोकमतला कापूस दर स्थिर राहतील असे सांगितले आहे. निवल यांच्या मते, सध्या कापूस दरात चढ उतार असला तरी लवकरच स्थिरता येणार आहे. मात्र जर शेतकरी बांधवांनी कापसाची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू केली तर बाजारात एकदम आवक बनेल आणि पुन्हा एकदा दरावर दबाव तयार होईल.