Cotton News : साधारणता गेल्या महिन्याभरापासून कापूस बाजार दबावात आहे. कापसाचे विक्रमी उत्पादन होईल असा अंदाज काही संस्थांनी वर्तवला होता यामुळे दर दबावात होते. परंतु कापूस उत्पादन भारतात कमी होणार असा अंदाज आल्यानंतर दरवाढीसाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे. दरात सुधारणा देखील झाली आहे. जवळपास दोनशे रुपयांपर्यंतची वाढ कापुस बाजार भावात नमूद करण्यात येत आहे.
सध्या स्थितीला देशात 7900 ते 8300 दरम्यान कापसाला भाव मिळत आहे. मात्र शेतकऱ्यांना बँकेचे तसेच इतर देणे देण्यासाठी पैशांची गरज आहे. परिणामी बाजारात आवक वाढली आहे. त्यामुळे आवकेचा दबाव दरावर आहे. ही परिस्थिती अजून काही दिवस कायम राहणार आहे. पुढील एक महिना अशीच परिस्थिती राहू शकते असा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे. एक महिन्यानंतर मात्र आवक मर्यादित राहील.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! देशातील ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 4 हजार रुपये; कोणाला मिळणार लाभ? वाचा सविस्तर
यामुळे कापसाची मागणी अन पुरवठा यामध्ये जर मोठी तफावत निर्माण झाली तर दरवाढीसाठी पोषक परिस्थिती तयार होणार आहे. एकंदरीत कापसाचा वापर वाढत आहे. आणि भारतात कापसाचे उत्पादन कमी राहणार असा अंदाज आत्ताच समोर आला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर कापूस दरवाढीसाठी आता परिस्थिती अनुकूल बनत आहे.
निश्चितच दरवाढ होणार असल्याने शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळेल. परंतु पुढील महिनाभर तरी कापूस दर दबावातच राहतील असं मत तज्ञांनी वर्तवला आहे. पण किती दर वाढतील? याबाबत तज्ज्ञांकडून अपेक्षित अशी माहिती मिळालेली नाही. परंतु दरवाढीची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने आपला कापूस विक्री करणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
हे पण वाचा :- रेल्वे प्रवाशांना लवकरच मिळणार 11व्या वंदे भारत ची भेट! ‘या’ रूटवर धावणार, पहा संपूर्ण रूटमॅप
संपूर्ण कापूस विक्री करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री केली तर शेतकऱ्यांचा फायदा या ठिकाणी होणार आहे. एकंदरीत, गेल्या हंगामात कापसाला 12 ते 13000 चा दर मिळाला होता. यादेखील हंगामात तशाच दराची आशा शेतकऱ्यांना होती. मात्र या हंगामात कापसाला अपेक्षित असा भाव मिळालेला नाही.
आता हंगाम जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मात्र तरीही दरात अपेक्षित अशी वाढ झालेली नाही. आगामी काळात दरवाढ होण्याची शक्यता असली तरी देखील सध्या 7900 ते 8 हजार 300 दरम्यान देशांतर्गत भाव मिळत आहे यामुळे दरात किती वाढ होते? यावरच शेतकऱ्यांचे यंदाच्या हंगामातील उत्पन्न अवलंबून राहणार आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी ! कोस्टल रोड प्रकल्प लांबण्याची शक्यता; ‘या’ वेळी पूर्ण होणार काम, वाचा सविस्तर