Cotton Market : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. ही बातमी आहे कापूस बाजारभावाच्या संदर्भात. कपाशी हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. या पिकाची संपूर्ण राज्यभर लागवड केली जाते. राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश या तीन विभागांमध्ये कापसाची मोठ्या प्रमाणात शेती होते.
कापूस लागवडीच्या बाबतीत आणि उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशात पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कापसाचे बाजार भाव दबावात असल्याचे पाहायला मिळत आहे. बाजारात कापसाला अपेक्षित असा दर मिळत नाहीये.
यामुळे शेतकरी चिंतेत आले आहेत. यंदा कापसाचा हंगाम विजयादशमीला सुरू झाला आहे.मध्यंतरी कापसाला 8,000 रुपये प्रति क्विंटल ते आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दरम्यान भाव मिळत होता.
परंतु ही भाव पातळी जास्त दिवस कायम राहिली नाही. आता तर कापसाचा हंगामा अंतिम टप्प्यात आला आहे. यामुळे हंगामाच्या अंतिम टप्प्यात तरी कापसाचे भाव सुधारणार का हा मोठा सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान याच संदर्भात बाजारातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कापसाच्या वायदे बाजारात बऱ्याच दिवसांनी मोठी सुधारणा पाहायला मिळाली आहे. कापसाच्या वायद्यांमध्ये आज अर्थातच 29 एप्रिल 2024 ला मोठी वाढ पाहायला मिळाली आहे.
यामध्ये आज दुपारपर्यंत जवळपास २ टक्क्यांनी वाढ झाली होती. आंतरराष्ट्रीय वायदेबाजाराबाबत बोलायचं झालं तर येथे आज दुपारपर्यंत भाव ८२.५० सेंट प्रतिपाऊंडवर पोहचले होते.
दुसरीकडे देशातील वायदे बाजारात देखील सुधारणा नमूद करण्यात आली आहे. देशातील वायदे ४६० रुपयांनी वाढले असल्याची माहिती तज्ञांनी दिली आहे. आज देशातील वायदे ५८ हजार ८०० रुपयांपर्यंत वाढलेत.
मात्र बाजार समित्यांमध्ये आज देखील भावपातळी फारशी वाढली नाही. आज देशांतर्गत बाजार समित्यांमध्ये कापसाला ७२०० ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान बाजार भाव मिळाला आहे.
पण आता फारच कमी शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक असल्याने बाजार समित्यांमध्ये आवक दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. दरम्यान कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
अर्थातच कापसाचे बाजार भाव आगामी काही दिवस असेच पाहायला मिळू शकतात. यामुळे शेतकऱ्यांनी बाजारातील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवावे आणि आपल्या गरजेनुसार कापसाच्या विक्रीचे नियोजन करावे असे बोलले जात आहे.