Cotton Market Update : कापसाला गत हंगामात बारा हजार रुपये प्रति क्विंटल ते 13 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळत होता. परिणामी यंदाही चांगला दर मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. विशेष बाब अशी की, दरवाढीच्या आशेने यंदा कापसाचीं लागवड देखील वाढली. मात्र मुहूर्ताचा काही कालावधी वगळला तर यंदा कापसाला गत हंगामाप्रमाणे दर मिळालेला नाही. आम्ही आपणास सांगू इच्छितो मुहूर्ताच्या कापसाला यंदा चौदा हजाराचा दर मिळाला होता.
विशेष म्हणजे नोव्हेंबर पर्यंत कापूस 9000 रुपये प्रति क्विंटल पर्यंतच्या सरासरी दरात विक्री होत होता. काही बाजारात तर कापसाला नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक कमाल बाजार भाव मिळत होता. मात्र गेल्या हंगामा प्रमाणे दर मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी कापसाचीं साठवणूक करून ठेवली. बहुतांशी शेतकऱ्यांनी अद्याप आपला कापूस विक्री केलेला नाही. दरम्यान आता दरात मोठी घसरण झाली आहे.
वास्तविक डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कापूस दरात घसरण सुरु झाली आहे. डीसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कापसाला मात्र साडेसात हजाराचा दर मिळाला होता. तदनंतर थोडीशी सुधारणा झाली जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कापसाला पुन्हा 9000 चा दर मिळू लागला मात्र हा दर अधिक काळ टिकू शकला नाही. सध्या स्थितीला कापूस दर दबावात असून आठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचाचं बाजार भाव कापसाला मिळत आहे. काही बाजारात 100-200 अधिक तर काही बाजारात 100-200 कमी देखील दर आहे.
एकंदरीत परिस्थिती पाहिली तर या हंगामात कापसाला दहा हजारापर्यंतचा कमाल दर मध्यंतरी नमूद केला जात होता. त्यावेळी सरासरी दर 9500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले होते. मात्र शेतकरी बांधवांनी गेल्या हंगामाप्रमाणेच विक्रमी दर कापसाला मिळेल या आशेने कापसाचीं साठवणूक करून ठेवली आणि त्यावेळी समाधानकारक दर असतानाही कापसाची विक्री केली नाही.
शेतकऱ्यांचे मते, गेल्या हंगामापेक्षा या हंगामात कापूस उत्पादित करण्यासाठी अधिक खर्च आला आहे. बियाणे, औषध तसेच इतर कृषी निविष्ठांच्या किमती दिवसेंदिवस आकाशाला गवसणी घालत असल्याने 9 हजार रुपये प्रति क्विंटल दरात देखील कापूस विक्री केला असता तर अपेक्षित असं उत्पन्न मिळाला नसतं. यामुळे त्यावेळी त्यांनी दरवाढीचीं वाट पाहिली. दरम्यान आता त्याहीपेक्षा कमी भाव कापसाला सद्या मिळत आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आहेत.
दरम्यान आता जाणकार लोकांनी मात्र पुन्हा एकदा कापूस दरात वाढ होण्याचा अंदाज बांधला आहे. जाणकार लोकांच्या मते, चायनाकडून आणि पाकिस्तानकडून नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणात कापसाची मागणी वाढणार आहे. हीच शक्यता लक्षात घेता जागतिक बाजारात गेल्या काही दिवसांपासून कापूस दरात तेजी आहे. साहजिकच जागतिक बाजारात तेजी आली असल्याने लवकरच देशांतर्गत कापूस दरात वाढ होऊ शकते. शिवाय भारतात कापसाचे फायदे देखील 13 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. ही परिस्थिती देखील कापूस दरात वाढ होण्यासाठी पोषक आहे.
जाणकार लोकांनी कापूस 9,000 ते 9500 दरम्यान या हंगामात विक्री होईल असा अंदाज बांधला आहे. म्हणजेच नजीकच्या काळात 1000 ते 1500 रुपये प्रति क्विंटल पर्यंतची वाढ होऊ शकते. निश्चितच शेतकरी बांधवांनी कापसाच्या विक्रीचे नियोजन करताना या गोष्टींची काळजी घ्यावी आणि टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री करावी.
एकदाच संपूर्ण कापूस विक्री करू नये तसेच सर्वच कापूस साठवणूक करून देखील ठेवू नये जेणेकरून शेतकऱ्यांना दरवाढ झाली तरी फायदा होईल आणि दरात वाढ झाली नाही तरी देखील याचा फटका बसणार नाही. शिवाय टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री केली तर बाजारात कापसाची आवक मर्यादित राहील आणि याचाही परिणाम म्हणून कापूस दराला आधार मिळेल.
Cotton Rate : शेतकऱ्यांनो, घाई नको ! कापूस दरात वाढ ही अटळ आहे ; वाचा तज्ञांच मत अन आजचे बाजारभाव