Cotton Market Update : देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय कामाची बातमी समोर येत आहे. परत पाहता भारतीय कापूस महामंडळ अर्थातच सीसीआयने 2020 नंतर चालू हंगामात कापूस खरेदीला सुरुवात केली आहे.
देशभरातील एकूण चार खरेदी केंद्रावर कापूस खरेदीचा श्री गणेशा सीसीआयच्या माध्यमातून करण्यात आला आहे. आता मंडळाने कापूस खरेदीला सुरुवात केली असल्याने कापसाचे दर वधारतील का हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात घर करून आहे.
खरं पाहता काही तज्ञ लोकांनी सीसीआयने कापूस खरेदी सुरू केली तर दराला आधार मिळेल अशी भविष्यवाणी केली आहे. आता प्रत्यक्षात महामंडळाकडून खरेदीला सुरुवात झाली असल्याने कापसाचे दर खरच वधारणार का? याबाबत तज्ञ लोक काय मत व्यक्त करतात याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, यंदा सीसीआयने खुल्या बाजारात मिळत असलेल्या दरानुसार कापूस खरेदी करण्याचा टार्गेट ठेवल आहे. सध्या भारतीय कापूस महामंडळाकडून ओडिशा आणि महाराष्ट्रात प्रत्येकी दोन खरेदी केंद्राला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील बदनापूर तसेच बीड जिल्ह्यातील गेवराई या ठिकाणी सीसीआयकडून कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे.
सुरुवातीच्या टप्प्यातच महामंडळाकडून कापसाला 8400 प्रति क्विंटल असा दर देण्यात आला आहे. साहजिकच हमीभावापेक्षा अधिक दराने सीसीआयने खरेदी सुरू केली आहे. यामुळे काही जाणकार लोक कापसाच्या दराला आधार मिळेल असं सांगत आहेत. पण काही जाणकार लोकांनी असं मत व्यक्त केल आहे की, गेल्या वर्षी जेवढे निर्यात झाली होती अर्थातच 46 लाख कापूस घाटींची निर्यात झाली होती तेवढीचं निर्यात यावर्षी देखील झाली आणि शासनाकडून निर्यातीसाठी सबसिडी मंजूर झाली तर निश्चितच कापसाचे दर वाढतील.
निर्यात वाढल्यास कापसाचा शिल्लक साठा कमी होईल आणि बाजारभावात स्थिर वाढ होईल. दरम्यान सीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे भविष्यात महामंडळाकडून अजून कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. निश्चितच सीसीआय कडून कापूस खरेदी सुरू झाली असल्याने फिक्स भाव वाढ होईल याबाबत कोणीही आश्वस्त नाही मात्र भाव वाढीची शक्यता देखील कोणी नाकारत नाहीये.
अशातच जाणकार लोकांनी यंदा कापसाला 9000 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळेल आणि हेच ध्यानात ठेवून शेतकऱ्यांनी कापूस विक्री केल्यास त्यांचा फायदा होईल असे मत व्यक्त केल आहे.