Cotton Market Price : शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. पांढरा सोन पुन्हा एकदा चमकल आहे. पांढर सोन अर्थातच कापसाच्या बाजारभावात वाढ झाली असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे.
खरे तर, कापूस हे राज्यात मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात उत्पादित केले जाणारे मुख्य पीक आहे. या पिकाची राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये लागवड केली जाते. साहजिकच या पिकावर राज्यातील शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे.
मात्र गेल्या हंगामापासून कापसाला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. या चालू हंगामाच्या सुरवातीला तर कापसाला हमीभावापेक्षा कमी भाव मिळत होता.
त्यामुळे शेतकऱ्यांची चांगली चिंता वाढली होती. जर बाजारभाव हमीभावाच्या आसपास राहिलेचं तर कोणत्याही परिस्थितीमध्ये कापसाचे पीक शेतकऱ्यांना परवडणार नाही असे सांगितले जात आहे.
याचे मुख्य कारण म्हणजे यंदा कापसाचे पीक उत्पादित करण्यासाठी शेतकऱ्यांना अधिकचा खर्च करावा लागला आहे. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे यावर्षी कमी पावसामुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट येण्याची भीती आहे.
अशा परिस्थितीत यंदा कापसाला 8 ते 10 हजार प्रतिक्विंटल एवढा किमान भाव मिळाला पाहिजे अशी शेतकऱ्यांची आशा आहे. सध्या स्थितीला मात्र बाजार समित्यांमधील दर अजूनही शेतकऱ्यांच्या अपेक्षा एवढे नाहीत.
सद्यस्थितीला कापसाला बाजारात साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी भाव मिळत आहे. खरंतर हा भाव गेल्या काही दिवसांपूर्वी सात हजार रुपये प्रतिक्विंटल पेक्षा खाली होता.
आता मात्र बाजार भाव सात हजारापेक्षा वर आले आहेत. विशेष म्हणजे बाजारभावात हळूहळू वाढ देखील होऊ लागली आहे. काल देखील राज्यातील प्रमुख बाजारांमध्ये कापसाला 7,100 ते 7310 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळाला आहे.
काल राज्यातील मनवत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला सर्वोच्च भाव मिळाला होता. या मार्केटमध्ये कालच्या लिलावात कापसाला किमान 7225, कमाल 7310 आणि सरासरी 7275 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला होता.
वास्तविक, कापसाच्या दरात थोडीशी सुधारणा झालेली असली तरी देखील शेतकरी बांधवांचे बाजारभावात आणखी सुधारणा झाली पाहिजे असे म्हणणे आहे.